खेड (प्रतिनिधी) - सांस्कृतिक वैभव जपणार्या खेड शहरात शिमगोत्सवाला जुनी आणि वैशिष्ट्यपूर्ण अशी चित्ररथांची परंपरा लाभली आहे. शहरातील सोनारआळी मित्र व महिला मंडळातर्फे साकारले जाणारे हे चित्ररथ खेडच्या सांस्कृतिक ओळखीचा अविभाज्य भाग बनले आहेत. ऐतिहासिक प्रसंगांवर आधारित देखणे चित्ररथ आणि त्यातील पात्रांची आकर्षक रंगभूषा पाहण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तळा मांडवा येथील आदिवासी भागात जिन्नस व लहान मुलांना शालेय उपयोगी वस्तूचे वाटप करण्यात आले. विद्यमान नगरसेविका व महिला मंडळाच्या सदस्या सौ.वैभवी वैभव खेडेकर यांच्या शुभहस्ते श्रीफळ वाढून चित्ररथ व मिरवणुकीचा प्रारंभ करण्यात आला. पहाटेपर्यंत चालणार्या या मिरवणुकीमुळे शहर डिजेच्या तालावर व उत्साहाच्या वातावरणात अक्षरशः दणाणून जाते. त्यामुळे ही रात्र खेड वासियांच्या विशेष उत्सवाची मेजवानी ठरते. सोनारआळी मित्र मंडळाचे अध्यक्ष नगराध्यक्ष ऍड.वैभव खेडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सोनारआळी मित्र व महिला मंडळाच्या सर्व सभासद यांच्या सहभागातून यंदाच्या शिमगोत्सवात चित्ररथातून पुष्पा २ हा प्रसंग अत्यंत देखण्या पद्धतीने सादर करण्यात आला. चित्ररथांमधील प्रमुख पात्रात असलेले दिलीप कारेकर व आकर्षक रंगभूषा शुभम जड्याळ आणि वेषभूषा स्वप्निल वनारे व प्रतीक पुळेकर यांनी साकारली. त्यांच्या कलात्मक हातोटीमुळे चित्ररथांतील प्रसंग अधिक जिवंत आणि प्रभावी वाटत होते. नागरिकांनीही या चित्ररथांला उत्स्फूर्त प्रतिसाद देत कलाकारांचे कौतुक केले. सोनार आळी मित्र व महिला मंडळाची असलेले एकजूट आणि परंपरा, कला आणि लोकसहभाग यांचा सुंदर संगम असलेला खेडमधील शिमगोत्सव आजही शहराच्या सांस्कृतिक परंपरेचे जतन करत असल्याचे या चित्ररथांच्या माध्यमातून पुन्हा एकदा अधोरेखित झाले.
टाइम्स स्पेशल
सुकिवली येथील महाराजस्व समाधान शिबीरास उत्स्फूर्त प्रतिसाद


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)






























































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.