loader
Breaking News
Breaking News
Foto

आरोस येथे गुढीपाडवा-रामनवमी निमित्त जिल्हास्तरीय अभंग गायन स्पर्धा

बांदा (प्रतिनिधी) - सावंतवाडी तालुक्यातील आरोस येथे गुढीपाडवा व रामनवमी महोत्सवानिमित्त यंदाही विविध सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. त्याअंतर्गत श्री देव गिरोबा युवक नाट्य मंडळ, आरोस यांच्या वतीने सिंधुदुर्ग जिल्हा मर्यादित अभंग गायन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धा दोन गटांमध्ये होणार असून १५ वर्षांपर्यंतचा बालगट आणि १५ वर्षांवरील खुला गट असे विभाग असणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या स्पर्धेसाठी १२ मार्चपर्यंत नावनोंदणी करण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे. स्पर्धकांनी मराठी संतांच्या रचनांवर आधारित अभंग सादर करणे आवश्यक असून चित्रपट गीतांच्या चालीवरील अभंग ग्राह्य धरले जाणार नाहीत. प्रत्येक स्पर्धकाला सादरीकरणासाठी ५ ते ८ मिनिटांचा वेळ देण्यात येणार आहे. संगीताची साथसंगत आयोजकांकडून उपलब्ध करून देण्यात येणार असून परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील. स्पर्धकांनी तबला व हार्मोनियमच्या साथीने तीन ते चार मिनिटांचा व्हिडिओ व्हॉट्सॲपवर पाठवणे आवश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

बालगटासाठी, खुल्या गटासाठी व्हिडिओ पाठवण्याचे आवाहन करण्यात आले आहे. परीक्षकांकडून निवड झालेल्या प्रत्येकी २० स्पर्धकांना अंतिम फेरीसाठी बोलावण्यात येणार आहे. बालगटाची अंतिम स्पर्धा १९ मार्च रोजी रात्री ८ वाजता, तर मोठ्या गटाची स्पर्धा २० मार्च रोजी होणार आहे. विजेत्यांना रोख पारितोषिके, सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात येणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg