दापोली : आर. ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन, दापोली संचलित न. का. वराडकर कला, रा. वि. बेलोसे वाणिज्य (कनिष्ठ व वरिष्ठ), शांतिलाल जैन विज्ञान (कनिष्ठ) आणि इंदुमती यादव माहिती तंत्रज्ञान महाविद्यालय, दापोली यांचा शैक्षणिक वर्ष २०२५-२६ चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. हा कार्यक्रम दि. १० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयात आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने झाली. त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाचा पुढील भाग सुरू झाला. प्राचार्य डॉ. भारत कर्हाड यांनी उपस्थितांचे स्वागत करून कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. महाविद्यालयाच्या स्थापनेपासून आतापर्यंत महाविद्यालयाने केलेली कामगिरी, उपलब्ध सुविधा, विविध अभ्यासक्रम, निकालाची गुणवत्ता आणि घडलेले विद्यार्थी यांची माहिती त्यांनी दिली. तसेच अलीकडील काळात महाविद्यालयास प्राप्त झालेला ‘बी प्लस’ ग्रेड आणि संशोधन क्षेत्रातील कार्याची माहितीही त्यांनी प्रास्ताविकात मांडली. यावेळी शैक्षणिक व सांस्कृतिक उपक्रमांचा अहवाल वरिष्ठ विभागातील रिया वैद्य आणि कनिष्ठ विभागातील प्राजक्ता कदम यांनी सादर केला. यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना विविध शैक्षणिक, सांस्कृतिक व क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
यामध्ये विविध दात्यांच्या स्मरणार्थ देण्यात येणारे आदर्श विद्यार्थी/विद्यार्थिनी गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. कै. हिराबाई रामचंद्र बेलोसे यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थिनी गौरव पुरस्कार रिया वैद्य (टीवायबीकॉम) यांना प्रदान करण्यात आला. प्राचार्य पारितोषिक आदर्श विद्यार्थी/विद्यार्थिनी (वरिष्ठ विभाग) गणेश वसावे (विद्यार्थी) व वेदिका वाघे (टीवायबीएससी आयटी) यांना प्रदान करण्यात आले. प्राचार्य पारितोषिक आदर्श विद्यार्थी/विद्यार्थिनी (कनिष्ठ विभाग) श्रीराम विजय आघरकर (विद्यार्थी) व आर्या भरत देवघरे (विद्यार्थिनी) यांना देण्यात आले. कै. बाबा फाटक यांच्या स्मरणार्थ आदर्श विद्यार्थी पारितोषिक कैलास उजाळ (टीवाय बीए) यांना रु. २५१/- व चषक देऊन प्रदान करण्यात आले. कै. भातासिंह मार्गे फाटक आदर्श विद्यार्थिनी पारितोषिक प्रिया घडसे (टीवाय बीएमएस) व फैमीदा राजपूकर (टीवाय बीए) यांना रु. २५१/- व चषक देऊन प्रदान करण्यात आले. तसेच कला, क्रीडा, सांस्कृतिक, एन.एस.एस., एन.सी.सी., ग्रंथालय विभाग आदी विविध विभागांतील ९० ते ९५ पारितोषिकेही विद्यार्थ्यांना वितरित करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे चेअरमन धनंजयराव यादव होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात बोलताना त्यांनी सांगितले की, ज्यांना बक्षिसे मिळाली आहेत ते निश्चितच अभिनंदनास पात्र आहेत; परंतु ज्यांना बक्षिसे मिळाली नाहीत आणि जे इतरांना टाळ्या वाजवून प्रोत्साहन देतात त्यांचेही तितकेच कौतुक केले पाहिजे. स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन अधिक वाढविण्याची गरज असल्याचे सांगून विद्यार्थ्यांनी स्पर्धा परीक्षांद्वारे पुढे यावे, तसेच पारंपरिक व्यवसायांऐवजी वेगळा विचार करून उद्योजक बनावे, असे त्यांनी आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा. एल. पी. पाटील यांनी आभार प्रदर्शन केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. दीपक गडकर यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)
































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.