loader
Breaking News
Breaking News
Foto

शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालयामधील विद्यार्थ्यांचे स्पर्धा परीक्षांमध्ये घवघवीत यश

आबलोली (संदेश कदम) - इंडियन बँकींग पर्सोनल सिलेक्शन या संस्थेमार्फत घेण्यात येणा-या भारतातील नामांकित राष्ट्रीय कृत बँकामधील उच्च श्रेणी पदांच्या परीक्षांचा निकाल नुकताच जाहीर झाला. या परीक्षेत शरदचंद्रजी पवार कृषि व संलग्न महाविद्यालय, खरवते-दहिवलीमधील जवळपास ०८ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन करत देशातील विविध राष्ट्रीयकृत बँकांमध्ये मोठ्या पदांना गवसणी घातली. यामध्ये प्रणोद धुमाळ व तेजस पावले यांची बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हीस असोसिएट म्हणून निवड झाली. केशव मकर याची नैनिताल बँकेमध्ये कृषि प्रक्षेत्र अधिकारी वर्ग १ पदी निवड झाली. सुरज दहिफळे याने दुहेरी यश संपादन करत कर्नाटक ग्रामीण बँकेमध्ये स्पेशालिस्ट ऑफीसर व बँक ऑफ इंडियामध्ये कस्टमर सर्व्हीस असोसिएट ही पदे पटकावली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच मानसी पाटील, पार्थ पवार, अक्षता मालेदार यांची युनियन बँक ऑफ इंडिया व बँक ऑफ इंडियामध्ये लिपिक या पदावर निवड झाली. तर आकांक्षा केसरे हिची फेडरल बँक मध्ये निवड झाली आहे. सह्याद्रि शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष व आमदार शेखर निकम तसेच महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुनितकुमार पाटील यांनी या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांना पुढील प्रशासकीय वाटचालीस शुभेच्छा दिल्या. हे सर्व विद्यार्थी देशातील विविध भागामध्ये आपली सेवा देणार असुन हे यश महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा तुरा ठरणार आहे. महाविद्यालयामधील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी यांचेकडून या विद्यार्थ्यांचे कौतुक होत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg