loader
Breaking News
Breaking News
Foto

महिला दिनीच गर्भवती महिलेवर उपोषणाची वेळ

​सावंतवाडी (प्रतिनिधी) - जगभरात आज जागतिक महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा होत असताना, सावंतवाडीत मात्र एका गर्भवती महिलेला आपल्या हक्कासाठी उपोषणाला बसावे लागल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. उपोषणादरम्यान प्रकृती चिंताजनक बनल्याने या महिलेला तातडीने उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रशासनाच्या या उदासीन भूमिकेबद्दल सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे. साटेली तर्फ सातार्डा येथील ग्रामपंचायत डाटा एन्ट्री ऑपरेटर वैभवी साटेलकर यांनी आपल्या न्याय्य मागण्यांसाठी सावंतवाडी पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषण सुरू केले होते. साटेलकर या गर्भवती असतानाही न्यायाच्या आशेने रणरणत्या उन्हात उपोषणास बसल्या होत्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

दुपारच्या सुमारास जिल्ह्यातील डाटा एन्ट्री ऑपरेटर संघटनेच्या विविध प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन पाठिंबा दर्शविला. मात्र, दुपारी ४ च्या सुमारास उपोषणामुळे आलेला अशक्तपणा आणि शारीरिक ताणामुळे साटेलकर यांची प्रकृती अचानक बिघडली. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. त्यांना तातडीने सावंतवाडी येथील शासकीय उपजिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असून डॉक्टर त्यांच्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहेत. आई होण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या एका महिलेला महिला दिनीच अशा प्रकारे रस्त्यावर उतरून उपोषण करावे लागणे, ही बाब संतापजनक असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, या प्रकरणाची गंभीर दखल घेत गटविकास अधिकारी वासुदेव नाईक यांनी साटेलकर यांना पत्र पाठवले असून, या प्रकरणाची सुनावणी मंगळवारी (१० मार्च) घेण्यात येणार असल्याचे कळवले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg