loader
Breaking News
Breaking News
Foto

किरकोळ कारणावरून वृद्धाला मारहाण, गुन्हा दाखल

लांजा (वार्ताहर) - किरकोळ कारणावरून एका ६३ वर्षीय वृद्धाला लाथाबुक्क्‌याने मारहाण, शिवीगाळ तसेच ठार मारण्याची धमकी दिल्याची घटना तालुक्यातील भांबेड कुडेवाडी येथे घडली असून प्रकरणी येथील पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भांबेड कुडेवाडी येथे जांगल देवाचे जुने मंदिर आहे. हे जुने मंदिर पाडून त्या जागी नवीन मंदिर बांधण्याकरिता गावाच्या सांगण्यावरून सुभाष शामकांत मोरे यांनी नारळ ठेवला होता. या कारणावरून संशयित आरोपींनी तक्रारदार सुभाष शामकांत मोरे यांच्या घरी जावून बेकायदा जमाव करून, दंगा करून, शिवीगाळ करून, हाताच्या थोपटाने तसेच लाथाबुक्याने त्यांना मारहाण केली. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. यामध्ये त्यांच्या उजव्या हाताच्या करंगळीला दुखापत झाली आहे. दरम्यान, याप्रकरणी सुभाष शामकांत मोरे यांनी लांजा पोलीस ठाण्यात केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी पाच संशयित आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता कलम १८९ (२), १९१ (२), १९०, ११५ (२), ३५२, ३५१ (२) याप्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड. कॉन्स्टे. दिनेश आखाडे हे करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg