खेड (दिलीप देवळेकर) - खेड तालुक्यातील राजकारणात मोठी घडामोड घडली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे जिल्हा सरचिटणीस तसेच खेडमधील ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. आनंदराव भोसले यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. या वेळी जिल्हा परिषद सदस्य अण्णा कदम, शिवसेना रत्नागिरी जिल्हा विधी सेवा समितीचे अध्यक्ष अॅड. सुधीर बुटाला, उद्योजक शैलेश शेठ कदम, शिवसेनेचे तालुकाप्रमुख व विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सचिन धाडवे तसेच अनेक वकील मंडळी आणि तिसंगी गावातील प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अॅड. आनंदराव भोसले हे खेड तालुक्यातील तिसंगी गावचे रहिवासी असून सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात त्यांचे मोठे योगदान आहे. ते माजी जिल्हा परिषद सदस्य असून रत्नागिरी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य म्हणूनही त्यांनी काम केले आहे. याशिवाय ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे रत्नागिरी जिल्हा सरचिटणीस म्हणून कार्यरत होते. शिवसेनेत प्रवेश करताना अॅड. भोसले यांनी शिवसेनेच्या विचारसरणीवर विश्वास व्यक्त करत पुढील काळात पक्षसंघटना अधिक मजबूत करण्यासाठी काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.