loader
Breaking News
Breaking News
Foto

सुकिवली येथे महाराजस्व समाधान शिबिराचे १४ रोजी आयोजन

खेड: महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील तळे महसूल मंडळ अंतर्गत सुकिवली येथे शनिवारी १४ मार्च रोजी येथील महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने तालुक्यात जिल्हाधिकारी मनोज जिंदल, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सिनकर व सुषमा धाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा १) राबविण्यात येत आहे. सुकिवली- गोपाळवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या आवारात सकाळी १० वाजता शिबिराची सुरुवात होणार आहे.

टाईम्स स्पेशल

या शिबिरात तळे मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यानी सहभागी होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तळेच्या मंडळ अधिकारी अर्चना लाकडे, ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील (तळे), सागर माने (सुकीवली), रोहन पाटेकर (दहिवली), राजेश चव्हाण (जैतापूर), राजेश डुकरे (मांडवे), योगेश आपटे (देवघर) तसेच सर्व कोतवाल, पोलिस पाटील आदी प्रयत्न करीत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg