loader
Breaking News
Breaking News
Foto

अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार, रत्नागिरीतील राजिवडा येथील घटना

​रत्नागिरी : शहरातील राजिवडा परिसरातून माणुसकीला काळीमा फासणारी एक संतापजनक घटना घडली आहे. एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार करून त्या कृत्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलिसांनी दोघा तरुणांना बेड्या ठोकल्या. या किळसवाणा प्रकारामुळे संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना २२ फेब्रुवारी २०२६ घडली. राजीवडा येथील संशयीत जुबेर सलीम शेख (वय २२) आणि संशयीत मुस्तकीन गडकरी (वय २४) या दोघांनी एका अल्पवयीन बालकावर अनैसर्गिक लैंगिक अत्याचार केले. पीडित बालक घाबरलेल्या अवस्थेत असल्याने त्याने सुरुवातीला या प्रकाराची कल्पना आपल्या पालकांना दिली नव्हती. मात्र, नराधम आरोपींनी या कृत्याचा व्हिडिओ बनवून तो सोशल मीडियावर व्हायरल केला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पीडित मुलाच्या वडिलांच्या निदर्शनास सोशल मीडियावर एक व्हिडिओ आला. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर त्यांना मोठा धक्का बसला. कारण व्हिडिओतील बालक त्यांचा स्वतःचा मुलगा असल्याचे त्यांच्या लक्षात आले. घटनेचे गांभीर्य ओळखून त्यांनी क्षणभरही विलंब न लावता थेट रत्नागिरी शहर पोलीस ठाणे गाठले आणि तक्रार नोंदवली. पालकांच्या तक्रारीवरून शहर पोलिसांनी संशयीत जुबेर शेख आणि संशयीत मुस्तकीन गडकरी यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांसह अत्यंत कडक अशा बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण अधिनियम (POCSO Act) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

टाईम्स स्पेशल

या कायद्यातील तरतुदींनुसार, अल्पवयीन मुलांवरील अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये कडक शिक्षेची तरतूद आहे. तसेच, व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित केल्यामुळे माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. ​घटनेचे गांभीर्य आणि संवेदनशीलता लक्षात घेता, या प्रकरणाचा तपास स्वतः पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांनी आपल्याकडे घेतला आहे. पोलिसांनी दोन्ही संशयित आरोपींना अटक केली. त्यांनी हा व्हिडिओ आणखी कुठे प्रसारित केला आहे का, याचा तांत्रिक तपास पोलिस करत आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg