loader
Breaking News
Breaking News
Foto

सिमेंटच्या जगातही शेणाने सारवलेल्या अंगणांचे गावपण अजून जिवंत

देवळे (प्रकाश चाळके) - ग्रामीण भागासह शहरी भागात विकासकामांना वेग आला असून सिमेंट काँक्रीट रस्ते, पेव्हर ब्लॉकची कामे मोठ्या प्रमाणात होताना दिसत आहेत. घरासमोरील अंगण, रस्ते आणि इतर जागांवरही सिमेंट काँक्रीट व पेव्हर ब्लॉकचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. मात्र या सिमेंटच्या जगातही काही गावांमध्ये आजही शेणाने सारवलेली जमीन तग धरून आहे. त्यामुळे गावांमधील पारंपरिक गावपण अजूनही जिवंत असल्याचे चित्र पाहायला मिळते. कौलारू घरे आणि घरासमोर शेणाने सारवलेले अंगण हे काही वर्षांपूर्वी ग्रामीण जीवनाचे प्रमुख आकर्षण होते. उन्हाळ्याच्या रात्री सारवलेल्या अंगणात झोपणे, कुटुंबीय आणि मित्रमंडळींसोबत गप्पा मारणे हा वेगळाच आनंद असायचा. पावसाळा संपल्यानंतर दिवाळीपूर्वी गावांमध्ये बुरूम माती व शेण यांचा वापर करून अंगण तयार केले जात असे. पहाटेच्या सुमारास जमिनीला मजबूत करण्यासाठी ‘चोपणे’ ही प्रक्रिया केली जात होती. या कामात घरातील महिला, मोठी मंडळी आणि लहान मुलेही उत्साहाने सहभागी होत असत. त्याच अंगणात चटई टाकून बसणे, खेळणे आणि गप्पा मारणे अशी एकत्रितपणाची परंपरा दिसून येत होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र जिल्ह्यात वाढत चाललेले औद्योगिकीकरण आणि पर्यटनामुळे ग्रामीण भागातील राहणीमानात मोठे बदल होत आहेत. शेणाने सारवलेल्या अंगणांची जागा आता सिमेंट काँक्रीट आणि पेव्हर ब्लॉकने घेतली आहे. त्यामुळे अशा पारंपरिक अंगणांचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होताना दिसत आहे. आज गावागावांत विकासकामांमुळे पेव्हर ब्लॉक व सिमेंट काँक्रीटचे अंगण मोठ्या प्रमाणात दिसू लागले असले, तरी काही ठिकाणी अजूनही बुरूम माती व शेणाने तयार केलेली जमीन टिकून आहे. ही परंपरा जपणाऱ्या गावांमुळे ग्रामीण संस्कृतीचे गावपण जपले जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. ग्रामीण भागात वाढलेल्या सिमेंट काँक्रीटीकरणामुळे माती व शेणाने तयार केलेल्या अंगणात बसण्याचा नैसर्गिक आनंद आता कमी होत चालला आहे. गावोगाव गल्लीबोळांत पेव्हर ब्लॉकचे जाळे पसरल्याने पारंपरिक अंगणात मिळणारा गारवा अनुभवणे कठीण होत आहे.

टाईम्स स्पेशल

याबाबत शितल बेटकर म्हणाल्या, “सध्या सिमेंट व पेव्हर ब्लॉकचे अंगण तयार केले जाते; मात्र त्यातून जमिनीचा नैसर्गिक गारवा जाणवत नाही. बुरूम माती आणि शेणाने सारवलेल्या जमिनीत मात्र गारवा कायम राहतो. उलट सिमेंट काँक्रीटीकरणामुळे उष्णता वाढते आणि त्याचा शरीराला त्रास होतो. त्यामुळे काही गावांमध्ये आजही शेणाने सारवलेले अंगण तयार करण्याची परंपरा जपली जात आहे.”

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg