खेड: महसूल विभागाशी संबंधित दैनंदिन कामाला वेग देण्यासाठी आणि नागरिकांची प्रलंबित कामे मार्गी लावण्यासाठी तालुक्यातील तळे महसूल मंडळ अंतर्गत सुकिवली येथे शनिवारी १४ मार्च रोजी येथील महसूल विभागाकडून छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियानातंर्गत प्रलंबित फेरफार, सातबारा उताऱ्यातील दुरुस्ती, जात आणि रहिवासी प्रमाणपत्र अशा विविध सुविधा एकाच छताखाली पुरवण्यात येणार आहेत.
ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, विद्यार्थी व महिलांचे महसूल विषयक प्रश्न तात्काळ निकाली काढून प्रशासन अधिक लोकाभिमुख, कार्यक्षम व गतिमान करण्याच्या उद्देशाने तालुक्यात जिल्हाधिकारी मनोज जिंदल, उपविभागीय अधिकारी वैशाली पाटील, तहसीलदार सुधीर सोनवणे, निवासी नायब तहसीलदार लक्ष्मीकांत सिनकर व सुषमा धाटकर यांच्या मार्गदर्शनाखाली छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबीर अभियान (टप्पा १) राबविण्यात येत आहे. सुकिवली- गोपाळवाडी येथील राधाकृष्ण मंदिराच्या आवारात सकाळी १० वाजता शिबिराची सुरुवात होणार आहे. या शिबिरात तळे मंडळ अंतर्गत येणाऱ्या सर्व लाभार्थ्यानी सहभागी होऊन विविध शासकीय सेवांचा लाभ घ्यावा असे आवाहन महसूल विभागाने केले आहे. या शिबिराच्या यशस्वीतेसाठी तळेच्या मंडळ अधिकारी अर्चना लाकडे, ग्राम महसूल अधिकारी अमोल पाटील (तळे), सागर माने (सुकीवली), रोहन पाटेकर (दहिवली), राजेश चव्हाण (जैतापूर) राजेश डुकरे (मांडवे), योगेश आपटे (देवघर) तसेच सर्व कोतवाल, पोलिस पाटील आदी प्रयत्न करीत आहेत.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.