संगलट खेड(इक्बाल जमादार) - पोलादपूर महाबळेश्वर वाई सुरूर राज्य मार्गावरील पोलादपूर तालुक्यातील बावली टोक येथे आंबेनळी घाटात मारुती वॅगनार कार सुमारे 300 ते 400 फूट खोल दरीत कोसळल्याची घटना गुरुवारी सकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघातात कार मधील 5 प्रवासी जखमी झाले. अपघातस्थळी महाबळेश्वर व प्रतापगड येथील रेस्क्यू टीमने धाव घेत सर्व जखमींना बाहेर काढून उपचारासाठी रुग्णावाहिकेद्वारे महाबळेश्वरला दाखल केले आहे. सातारा जिल्ह्यातील लाखवड गावचे काही ग्रामस्थ मुंबईहून गावी परतताना पहाटेच्या सुमारास आंबेनळी घाटातील बावली टोक–चिरेखिंड दरम्यान वाहनाचा ताबा सुटल्याने वॅगनार कार रस्त्याच्या कडेला जाऊन खोल दरीत कोसळली.
अपघातानंतर वाहन थेट सुमारे ३०० ते ४०० फूट खोल दरीत जाऊन अडकले. या कार अपघातात अजय सुनील सकपाळ, तुकाराम संकपाळ, सुनील संकपाळ, पार्थ संकपाळ आणि संगीता संकपाळ हे प्रवासी जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी महाबळेश्वर येथील रुग्णालयात हलवण्यात आले. आंबेनळी घाटातील घटनास्थळी अत्यंत धोकादायक परिस्थितीत दरीमध्ये उतरून बचावकार्य करणाऱ्या रेस्क्यू टिमच्या सदस्यांनी केलेल्या धाडसाचे कौतुक होत आहे. प्रतापगड सर्च एंड रेस्क्यू टीम चे सदस्य संकेत सावंत व ऋषिकेश जाधव याना या अपघाताची माहिती मिळताच त्यांनी इतर सदस्यांना संपर्क साधून रेस्क्यूवर्कला सुरवात केली.
प्रतापगड सर्च एंड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव, अनिकेत वागदरे, संकेत सावंत, ऋषिकेश जाधव यांनी घटनास्थळी धाव घेत महाबळेश्वर ट्रेकर्सच्या सदस्यांना देखील अपघाताची माहिती दिली. स्पॉटवर पोहोचल्यानंतर दोरीच्या मदतीने रेस्क्यूटीमचे सदस्य दरीमध्ये उतरले. जी व्यक्ती जास्त जखमी आहे त्याला स्ट्रेचरवरून दोरीच्या सहाय्याने घाट रस्त्यावर काढण्यात आले. याप्रकारे उर्वरित सर्व जखमीना सुखरूप वर काढून कारमधील सर्व ५ जखमी प्रवाशांना महाबळेश्वर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. या बचाव मोहिमेत प्रतापगड सर्च एंड रेस्क्यू टीम चे अनिकेत वागदरे, अजित जाधव, ऋषिकेश जाधव, आशिष बिरामने, संकेत सावंत तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सुनीलबाबा भाटिया, अमित कोळी, सुजित कोळी, सोमनाथ वागदरे यांच्या मदतीसाठी वाडा कुंभरोशी व चिरेखिंड ग्रामस्थ तसेच पोलादपूर पोलीस ठाण्याचे कर्मचारी उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.