खेड : तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीतील सुप्रिया लाईफ सायन्स कंपनीत एचआर मॅनेजरला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी एका व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मार्च २०२६ रोजी दुपारी सुमारे १२.३० वाजण्याच्या सुमारास लोटे येथील सुप्रिया लाईफ सायन्स लि. कंपनीत ही घटना घडली. लोटे गावाची गावदेवीची पालखी नेहमीप्रमाणे यावर्षीही कंपनीत आलेली असताना संशयीत आरोपी शैलेश शिवाजी चाळके (रा. पिरलोटे, दत्तवाडी, ता. खेड) याने कंपनीच्या गेटमधून अनधिकृतपणे कंपनीच्या आवारात प्रवेश केला.
त्यानंतर त्याने कंपनीचे एचआर मॅनेजर मनोज दिगंबर भामरे (वय ५०, रा. पिरलोटे, ता. खेड) यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत त्यांच्या अंगावर धावून जाऊन जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याची तक्रार करण्यात आली आहे. या प्रकरणी खेड पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ५१/२०२६ अन्वये भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम १३१, ३३२ (सी), ३५१ (३) व ३५२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.