रसायनी (राकेश खराडे) - रायगड जिल्ह्यात स्वच्छ भारत अभियानाची प्रभावी अंमलबजावणी सुरु असून या अभियानामुळे अनेक ग्रामपंचायतीना संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात मानांकन मिळाले आहे. जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी खालापूर तालुक्यातील स्वच्छतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या दोन महिला सरपंच व तालुक्यातील दोन महिला स्वच्छता कर्मचारी यांच्यासाठी कॉफी वूईथ विनर कार्यक्रम रायगड जिल्हा परिषद अलिबाग येथे दिनांक ११ मार्च २०२६ रोजी आयोजित करण्यात आला होता. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा प्रियदर्शिनी मोरे यांनी उपस्थिताना मार्गदर्शन केले.
या समारंभात खालापूर तालुक्यातील स्वच्छतेत उत्कृष्ट काम करणाऱ्या वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सरपंच उमाताई संदिप मुंढे व माजगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली नरेश पाटील तसेच वासांबे मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या सफाई कामगार तारा चिंतामण खारकर, सुनिता अनंत घाटे या दोन महिला स्वच्छता कर्मचारी यांना सन्मानित करण्यात आले. सरपंच -उमाताई संदिप मुंढे व सफाई महिला कर्मचारी यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.