loader
Breaking News
Breaking News
Foto

ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना जीवन गौरव पुरस्कार प्रदान

मालवण (प्रतिनिधी) - अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे देण्यात येणारा जीवन गौरव पुरस्कार तारकर्ली येथील ज्येष्ठ नाट्यकलाकार आप्पाजी उर्फ रतिलाल श्रीधर तारी यांना प्रदान करून सन्मानित करण्यात आले. अष्टपैलू कलानिकेतन, मालवणतर्फे नटवर्य कै. राम गणेश गडकरी यांच्या स्मृतिप्रित्यर्थ सवेश साभिनय नाट्यगीत गायन स्पर्धा तसेच जीवन गौरव पुरस्कार सोहळा मालवण भरड येथील श्री दत्त मंदिर येथे संपन्न झाला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी व्यासपीठावर उद्योजक दत्ता सामंत, नगराध्यक्ष ममता वराडकर, ज्येष्ठ नाट्यकलाकार रतिलाल तारी, सुधीर कुर्ले, अष्टपैलू कलानिकेतनचे अध्यक्ष भालचंद्र केळूसकर, नगरसेवक महेश कांदळगावकर, परीक्षक संजय धूपकर, भाई शेवडे आदी उपस्थित होते. यावेळी दत्ता सामंत यांच्या हस्ते नाट्यकलाकार रतिलाल तारी यांना शाल, श्रीफळ, गौरवपत्र, सन्मानचिन्ह देऊन जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तर रतिलाल तारी यांच्या पत्नी सौ. राजश्री तारी यांचा मानाची साडी, ओटी व मोत्याचा हार प्रदान करून सौ. आचरेकर यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी रतिलाल तारी यांनी पुरस्काराबद्दल संस्थेचे आभार मानले. यावेळी नगरसेविका महानंदा खानोलकर, अश्विनी कांदळकर, अनिता गिरकर, शिवसेना तालुकाप्रमुख मंदार लुडबे यांच्यासह अष्टपैलू कलानिकेतनचे सदस्य, कलाकार मंडळी व नागरिक उपस्थित होते.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg

अष्टपैलू कलानिकेतन संस्थेतर्फे सन्मान

foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg