loader
Breaking News
Breaking News
Foto

लांजा तालुक्यातील बेनी बुद्रुक येथे मागील काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर

लांजा (संजय साळवी) - तालुक्यातील बेनी बुद्रुक येथे मागील काही दिवसांपासून गवा रेड्यांचा वावर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. गवा रेड्यांच्या एका कळपाने धुमाकूळ घालत हापूस आंब्याच्या बागेचे मोठे नुकसान केल्याची घटना घडली. बेनी बुद्रुक येथील शेतकरी दीपक सुर्वे यांच्या आंबा बागेत रात्रीच्या वेळी गवा रेड्यांचा कळप शिरल्याने हापूस आंब्याची झाडे तुटून नुकसान झाले आहे. गव्यांच्या कळपाने सुर्वे यांच्यासह इतर शेतकऱ्यांचेही नुकसान केले असून ऐन आंबा हंगामाच्या तोंडावरच शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान झाले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सध्या हापूस आंबा हंगाम सुरू होण्याच्या मार्गावर असताना झालेल्या अशा नुकसानीमुळे दीपक सुर्वे यांच्यासह अन्य शेतकरी चिंतेत पडले आहेत. बेनी बुद्रुक परिसरात मागील काही दिवसांपासून गव्यांचा वावर वाढला असून तेथील शेतकऱ्यांच्या बागायती पिकांना धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. दरम्यान, या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली असून पंचनामा करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकरी दीपक सुर्वे यांनी केली आहे. तसेच या वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात अशी मागणीही परिसरातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg