loader
Breaking News
Breaking News
Foto

आई -वडील, गुरु आणि देश यांचे ऋण न फिटण्यासारखे -जि. पं. सदस्य अभिषेक विचारे

म्हसळा( वार्ताहर) - विद्यार्थ्यांना रोजच्या जीवनात लागणाऱ्या आहाराबाबत माहिती, बाजारहाट, सामाजिक आणि शैक्षणिक देवाणघेवाण यांचे सखोल ज्ञान आणि जागरूकता निर्माण व्हावी तसेंच स्वावलंबी होण्यासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी पी. एम. श्री. रा. जि. प. शाळा म्हसळा येथे आठवडा बाजार आणि खाद्य जत्रेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये व्हेज कटलेट, वडापाव, भेळ, सरबत, भजी, फालुदा, आंबा पने, कांदा पोहे, अप्पे, सॅलड आदी वस्तूंचे स्टॉल लावण्यात आले होते. सभापती बबन मनवे यांच्या हस्ते या आठवडा बाजार आणि खाद्य महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या प्रसंगी जि. प. सदस्य अभिषेक विचारे, नगराध्यक्ष अनिकेत पानसरे, माजी नगराध्यक्षा जयश्री कापरे, माजी नगरसेविका संपदा पोतदार, समाजसेविका नीता ढवळे,पं. स. सदस्या समृद्धी चाचले, संतोष पाखड, केंद्र प्रमुख धामणकर, दिलीप करंबे, व्यवस्थापन समिती अध्यक्ष बाबू शिर्के, मुख्याध्यापिका सुमित्रा खेडेकर, श्रीधर उमदी, मिलिंद मुंडे, जयश्री गायकवाड, इंदिरा चौधरी, नरेश गावित, विषय शिक्षक अनिल बेडके, व्यवस्थापन समिती सदस्य, पालक आदी मान्यवर उपस्थित होते. या वेळी आपल्या मनोगतात जि. प. सदस्य अभिषेक विचारे यांनी सांगितले कि, शाळेने हा विधायक उपक्रम राबवून विद्यार्थ्यांना जीवन कसे जगावे यासाठी प्रोत्साहन दिले आहे. निश्चितच अशा शिक्षकांचे कौतुक होणे अत्यावश्यक आहे.

टाईम्स स्पेशल

विद्यार्थी हाच शाळेचा केंद्रबिंदू असून तो समाजाचा एक आदर्श व्हावा अशी इच्छा व्यक्त करून विद्यार्थ्यांनी यातून बोध घ्यावा असे आवाहन केले. मात्र विद्यार्थ्यांनी आपले आई -वडील, गुरुजन आणि देश यांचे उपकार विसरू नये कारण त्यांचे ऋण कधीही न फिटण्यासारखे असल्याचे विचारे यांनी सांगितले. सभापती बबन मनवे यांनीही विद्यार्थ्यांना शुभेच्छा देऊन विज्ञान युगात प्रगती करण्याचे आवाहन केले. मुख्याध्यपिका सुमित्रा खेडेकर यांनी प्रास्ताविक केले, सूत्रसंचालन मुंडे यांनी केले तर अनिल बेडके यांनी उपस्थित्यांचे आभार मानले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg