loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी 'कोमसाप'तर्फे मिलिंद भोसले व दीपक नेवगी यांना आदरांजली; प्रवीण भोसले, शेखर पाडगांवकर यांना पुरस्कार जाहीर

सावंतवाडी (प्रतिनिधी) - कोकण मराठी साहित्य परिषद (कोमसाप) शाखा सावंतवाडीच्या वतीने शाखेचे दिवंगत सदस्य स्व. प्रा. मिलिंद भोसले आणि स्व. ॲड. दीपक नेवगी यांना त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. याप्रसंगी त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांची घोषणाही करण्यात आली. यावर्षीचा 'स्व. प्रा. मिलिंद भोसले सामाजिक, शैक्षणिक, राजकीय, साहित्य, कला-सांस्कृतिक सेवा पुरस्कार' राज्याचे माजी राज्यमंत्री प्रवीण भोंसले यांना जाहीर झाला आहे. तसेच, 'स्व. ॲड. दीपक नेवगी सामाजिक, आध्यात्मिक, साहित्य, विधी सेवा पुरस्कार' कीर्तनकार तथा सेवानिवृत्त जिल्हा कामगार अधिकारी शेखर पाडगांवकर यांना प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा कोमसापचे शाखाध्यक्ष दीपक पटेकर यांनी केली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

पुरस्कारांचे वितरण शुक्रवार, २० मार्च २०२६ रोजी सकाळी १० वाजता मळगाव इंग्लिश स्कूलच्या 'चिंतन, हेमंत, शैलजा परब सभागृहात' होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख अतिथी म्हणून कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर उपस्थित राहणार असून, अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त पोलीस उपविभागीय अधिकारी दयानंद गवस असतील. अभिवादन सभेवेळी कोमसापचे अध्यक्ष दीपक पटेकर, सचिव राजू तावडे, उपाध्यक्ष अभिमन्यू लोंढे, सहसचिव विनायक गांवस, सदस्य दिनानाथ नाईक यांच्यासह कार्यकारिणीचे सदस्य व साहित्यप्रेमी पत्रकार विजय राऊत, रामचंद्र कुडाळकर, संतोष परब आदी उपस्थित होते. या सोहळ्यास बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन 'कोमसाप' सावंतवाडी शाखेच्या वतीने करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg