loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी: जिल्ह्यातील पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीच्या प्रक्रियेने वेग घेतला असून, संपूर्ण जिल्ह्यात राजकीय हालचालींना उधाण आले आहे. जिल्ह्यावर प्रामुख्याने शिवसेनेचे वर्चस्व पाहायला मिळत असून राजापूर, लांजा खेड, रत्नागिरी आणि गुहागर यांसारख्या महत्त्वाच्या तालुक्यांमध्ये शिवसेनेने आपले वर्चस्व कायम राखले आहे. चिपळूणमध्ये मात्र राजकीय समीकरणे काहीशी वेगळी असून तिथे सभापतीपद राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वाट्याला गेले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

​गुहागर तालुक्यात सत्तेचे समीकरण शिवसेना आणि भाजप यांच्यात विभागले गेले असून, तिथे शिवसेनेचा सभापती तर भाजपचा उपसभापती अशी युती पाहायला मिळत आहे. या संपूर्ण प्रक्रियेत सर्वांचे लक्ष आता रत्नागिरी तालुक्याकडे लागले आहे. रत्नागिरीच्या सभापती पदासाठी तारक मयेकर आणि कांचन नागवेकर यांची नावे सध्या आघाडीवर असून, त्यांच्यापैकी कोणाच्या गळ्यात विजयाची माळ पडणार याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

टाईम्स स्पेशल

या निवडीसाठी उद्या सोमवारी सकाळी ११ वाजता रत्नागिरीत प्रांत जीवन देसाई यांच्या उपस्थितीत अधिकृत निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. विशेष म्हणजे अनेक तालुक्यांमध्ये राजकीय पक्षांमध्ये आपापसात समन्वय साधला गेल्यामुळे, ही निवडणूक प्रक्रिया केवळ औपचारिकता उरण्याची शक्यता आहे. बहुतांश ठिकाणी कोणत्याही विरोधाशिवाय ही निवड बिनविरोध होईल, असे संकेत सध्याच्या राजकीय वातावरणावरून मिळत आहेत. यामुळे प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून उद्याच्या निर्णयाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg