loader
Breaking News
Breaking News
Foto

रामेश्वर मांड येथे १९ मार्चपासून धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रम

मालवण (प्रतिनिधी) - मालवण सोमवार पेठ येथील श्री रामेश्वर मांड मित्रमंडळाच्या वतीने गुढीपाडव्या निमित्त दि. १९, २० व २१ मार्च रोजी विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गुरुवार दि. १९ रोजी सत्यनारायण महापूजा, सकाळी ८ वाजता लघुरुद्र, सायंकाळी ५ पासून तीर्थप्रसाद, ५ वाजता सातेरी भजन मंडळ, कांदळगाव यांचे भजन (बुवा – राजेंद्र कोदे, पखवाज – बंटी कांदळगावकर, तबला दत्ताराम डिकवलकर), ६.३० वाजता महापुरुष भजन मंडळ, माड्याचीवाडी कुडाळ यांचे भजन (बुवा ऋषिकेश गावडे, पखवाज लक्ष्मण गावडे), रात्री ८ वाजता श्री दत्तगुरू भजन मंडळ कासार्डे, कणकवली (बुवा - प्रकाश पारकर, पखवाज – घनश्याम मेस्त्री) यांचे भजन सादर होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शुक्रवार २० रोजी सायंकाळी ७.३० वाजता चेंदवणकर गोरे दशावतार नाट्य मंडळ, कवठी यांचा 'शस्त्र गर्भा भगवती' हा नाट्यप्रयोग भंडारी हायस्कूलच्या पटांगणावर सादर होणार आहे. शनिवार, २१ रोजी रात्री ९.३० वाजता पडद्यावर सुपरहिट हिंदी चित्रपट 'धुरंधर' भंडारी हायस्कूल पटांगण येथे दाखविण्यात येणार आहे. सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन श्री रामेश्वर मांड मित्रमंडळ, मालवणतर्फे करण्यात आले आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg