दोडामार्ग (प्रतिनिधी) - घडलेल्या घटना, अपघात किंवा इतर क्षेत्रात महत्त्वाचे पुरावे म्हणून सार्वजनिक ठिकाणी, किंवा मुख्य रस्त्यावर बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे हा महत्त्वाचा पुरावा होऊ शकतो, किंवा एखादे वाहन, अपघात करून गेले किंवा चोरटे, यांचा तपास करण्यासाठी मदत होऊ शकते, पण दोडामार्ग पिंपळेश्वर चौकातील अनेक सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या काही महिन्यांपूर्वी पासून पूर्णपणे बंद पडले आहेत. तेव्हा बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने प्रशासनाने सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.
दोडामार्ग पिंपळेश्वर चौकातील चारही रस्ते एकञ मिळताच शिवाय, महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, इतर राज्ये याना जोडणारे रस्ते दोडामार्ग शहरातून गेले आहेत. यामुळे शेकडो वाहने ये जा करतात. दोडामार्ग तालुक्यातील काही गावात चोरीच्या घटना घडल्या आहेत. पण चोरटे हाती लागत नाही. दोडामार्ग शहर हे तालुका ठिकाण आहे. बाजारपेठ मोठी आहे. सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस वतीने काही महिन्यांपूर्वी पिंपळेश्वर चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले होते. पण हे सीसीटीव्ही कॅमेरे बंद पडलेले आहेत. पोलिसांनी संबंधित ठेकेदार याला कळवून देखील सुरू केले नाही. यामुळे पोलिसांना देखील काही घटना कळत नाही फुटेज मिळत नाही.
दोडामार्ग पिंपळेश्वर चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे जर पोलीस यंत्रणा सुरू करत नसेल तर या ठिकाणी कसर्ई दोडामार्ग नगरपंचायत यांनी दोडामार्ग शहरात चोऱ्या होऊ नये, इतर समस्या लक्षात घेऊन नगरपंचायत वतीने पिंपळेश्वर चौकात, दोडामार्ग तहसीलदार कार्यालय, बस स्थानक चौकात चारही रस्त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे तातडीने बसवावे अशी मागणी केली जात आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.