loader
Breaking News
Breaking News
Foto

गृहराज्यमंत्री योगेश कदम यांचे मुंबईतील भेटीत नगराध्यक्ष, उपनगराध्यक्षांना आश्वासन

संगलट खेड (इक्बाल जमादार) - केवळ नवानगर हा भाग खेड शहराच्या हद्दीत समाविष्ट करून चालणार नाही, तर खेड शहराच्या आजूबाजूला असलेल्या गावांचाही समावेश खेड शहराच्या हद्दीत करण्यात यावा, यासाठी मी माझ्या स्तरावरून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी दिले. खेड शहरानजीक असलेल्या भडगाव खोंडे गावच्या हद्दीतील नवानगर या भागातील नागरिकांनी शहरात समाविष्ट होण्यासाठी पत्र दिले असल्याने याबाबत अंतिम निर्णय घेण्यासाठी तसेच अन्य विकासकामाबाबत महत्वपूर्ण चर्चा करण्यासाठी खेडच्या नगराध्यक्ष माधवी बुटाला, उपनगराध्यक्ष सतीश भाई चिकणे व सहकारी नगरसेवकांनी मुंबई येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची भेट घेत चर्चा केली. यावेळी भडगाव हद्दीतील नवानगर हा भाग खेड शहराच्या हद्दीत समाविष्ट करण्यात यावा, यासाठी चर्चा झाली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या हद्दवाढीमुळे खेड शहराचा विकास हा झपाट्याने होईल तसेच नगर विकास खात्याकडून मोठ्या प्रमाणात निधी येऊन शहराचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे यावेळी राज्यमंत्री योगेश कदम यांनी सांगितले. त्यामुळे लवकरच खेड शहराच्या जवळील गावांचाही समावेश खेड नगरपालिका हद्दीत केला जाण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे खेड नगरपालिका 'क' वर्ग मधून "ब' वर्ग नगरपालिकेमध्ये जाण्याची शक्यता आहे. मुंबई येथे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांची खेडच्या नगराध्यक्ष माधवी राजेश बुटाला यांनी शहराच्या विकास कामांकरिता मुबंई सुनौती बिल्डिंग या कार्यालयात भेट घेतली. या भेटीवेळी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना खेड शहराच्या सर्वांगीण विकासाकरिता आवश्यक निधीच्या मागणीचे पत्र देण्यात आले. यावेळी उपनगराध्यक्ष सतिश उर्फ पप्पू चिकणे, शहरप्रमुख कुंदन सातपुते, बांधकाम सभापती सुनील दरेकर, आरोग्य स्वछता सभापती तोसिफ खोत आदी उपस्थित होते. खेड शहर हद्दवाढ, रस्ते अनुदान, वैशिष्ट्यपूर्ण निवी, नवीन फायर फायटर खरेदी, ६००० लिटरचा पाणी टँकर खरेदी करणे तसेच नवीन जेसीबी मिळावा असे मागणी पत्र यावेळी देण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg