loader
Breaking News
Breaking News
Foto

वैभव खेडेकर मित्र परिवार तर्फे रमजान निमित्त मुस्लिम बांधवांकरिता “इफ़्तार पार्टी”चे आयोजन

खेड (दिलीप देवळेकर) - सध्या मुस्लिम बांधवांचा पवित्र रमजान महिना सुरू असून, दिवसभरचे उपवास सोडण्यासाठी सर्वत्र इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात येते, आज १४ मार्च रोजी हॉटेल चंदी हवेली भरणे नाका येथे मुस्लिम बांधव यांच्यासाठी रोजा इफ्तार चे आयोजन करण्यात आले होते. रमजान महिन्यातील २४ वा रोजा! अतिशय प्रेमाने आणि स्नेहपूर्वक त्यांनी आदरातिथ्य केले. सर्वांसोबत हे आनंदाचे क्षण वाटून घेत खूप उत्साहात इफ्तारी संपन्न झाली. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांची सामाजिक बांधिलकी जपण्याकरिता वैभव खेडेकर मित्रपरिवार यांच्यातर्फे 'ईप्तार पार्टी' चे आयोजन केले आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

आजपर्यंत खेडमध्ये सर्व धर्मियांच्या सणांमध्ये वैभव खेडेकर अग्रक्रमाने सहभागी होऊन सामाजिक बांधिलकी जपत सर्व सणाचा, व नागरिकांचा उत्साह द्विगुणित करित आले आहेत. त्याचाच एक भाग म्हणून या 'ईप्तार पार्टी'चे आयोजन करण्यात आले आहे. सामाजिक ऐक्य, परस्पर सौहार्द, प्रेम, बंधुभाव व मानवतेची शिकवण देणारा रमजान महिना हा मुस्लिम बांधवांसाठी खूप पवित्र आणि महत्वाचा मानला जातो.

टाईम्स स्पेशल

मुस्लिम बंधू-भगिनींच्या समवेत इफ्तारी करून खूप आनंद वाटला. माजी नगराध्यक्ष अँड वैभव खेडेकर व विद्यमान नगरसेविका वैभवी वैभव खेडेकर यांनी त्यांच्या कुटुंबियांना आणि उपस्थित मुस्लिम बांधवांना पुढील रोज्यांसाठी खूप शुभेच्छा. दिल्या या ईप्तार पार्टी' प्रसंगी उपस्थित खेड चे डीवायसपी शैलेश सणस पोलीस निरीक्षक विवेक आहिरे यांनी भेट देऊन उपस्थित मुस्लिम बंधू - भगिनींना रमजान महिन्याच्या व येणाऱ्या रमजान ईदेच्या शुभेच्छा दिल्या.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg