पनवेल (जितेंद्र गावडे) - पनवेल तालुका पंचायत समितीच्या राजकारणात ऐतिहासिक बदल घडला असून पहिल्यांदाच भारतीय जनता पक्षाचे कमळ या समितीवर फुलले आहे. भाजपच्या वतीने करंजाडे गणातून निवडून आलेल्या रंजना सदाशिव वास्कर सभापतीपदी तर आदई गणातून निवडून आलेले भूपेंद्र सदानंद पाटील हे उपसभापती विराजमान झाले आहेत. अनेक दशकांपासून पंचायत समितीवर असलेला शेतकरी कामगार पक्षाचा एकछत्री अंमल आता संपुष्टात आली आहे. या निवडीनंतर घोषणा, ढोलताशा आणि फटाक्यांच्या जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली. यावेळी आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यास तसेच भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आले.
शहरात भाजपची सत्ता असली तरी ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मात्र शेतकरी कामगार पक्षाचा लाल बावटा फडकत होता. मात्र २०१७ नंतर ग्रामीण भागातही भाजपचा प्रभाव वाढू लागला. त्याचे स्पष्ट चित्र नुकत्याच पार पडलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत दिसून आले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, युवा नेते परेश ठाकूर व प्रितम म्हात्रे यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवण्यात आली. पनवेल पंचायत समितीच्या निवडणुकीत शेकापला एकही सदस्य निवडून आणता आला नाही. भाजपने १६ पैकी तब्बल १५ सदस्य निवडून आणत शेकापचा पराभव केला.
गेल्या अनेक पंचवार्षिक निवडणुकांमध्ये पनवेल पंचायत समितीवर शेकापचा झेंडा फडकत होता आणि इतर पक्षांसाठी येथे विजय मिळवणे अत्यंत कठीण मानले जात होते. मात्र २०२६ च्या निवडणुकीत आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भाजपने हे समीकरण पूर्णपणे बदलून टाकले आहे. त्यामुळे पनवेलच्या ग्रामीण राजकारणात लाल बावट्याचा अध्याय संपून भाजपचा नवा अध्याय सुरू झाला असून त्या अनुषंगाने पनवेल पंचायत समितीच्या माध्यमातून तळागाळात विकास पोहोचविण्याचा मार्ग सुकर झाला आहे.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)
































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.