वरवेली (गणेश किर्वे) - गुहागर तालुक्यातील पांगारी खांबेवाडी येथील महापुरुष मंडळ आणि सालबाई देवी महिला मंडळ (धाकटा घराणा) यांच्या वतीने व मनसे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी यांनी दिलेल्या तीन लाख दहा हजाराचा निधी मधून बांधण्यात आलेल्या सभागृहाचे उद्घाटन दिमाखात संपन्न झाले.मनसे गुहागर संपर्क अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी हे वैयक्तिक कामामुळे बाहेरगावी असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर यांच्या शुभहस्ते उद्घाटन करण्यात आले.
यावेळी संतोष खांबे यांनी सांगितले की,मनसेचे गुहागर तालुका संपर्क अध्यक्ष, जिल्हा परिषद सदस्य प्रमोद गांधी दिलेल्या भरघोस देणगीतून सभागृहाचे बांधकाम झाले आहे त्यामुळे त्यांचे आम्ही सर्व पांगारी खांबेवाडीतील सर्व ग्रामस्थ आभारी आहोत. तसेच उपजिल्हा अध्यक्ष विनोद जानवळकर यांनी आमच्या खांबेतील कोणतीही समस्या असल्यास तात्काळ सोडवण्याचा सतत प्रयत्न करतात, असे सांगितले. मुंबई मंडळाचे अध्यक्ष विजय खांबे यांनी सांगितले की, मनसेचे पदाधिकारी विनोद जानवळकर यांनी आम्ही जरी मुंबईत असलं तरी आमच्या गावच्या कोणत्याही समस्या असल्या अडीअडचणी असल्या तर आमच्या गावातील ग्रामस्थांना वेळी मदत करून धावून येतात त्यामुळे त्यांचे आम्ही आभारी आहोत.
यावेळी मनसे उपजिल्हा अध्यक्ष विनोद गणेश जानवळकर, मुंबई अध्यक्ष विजय खांबे, शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रसाद कुष्टे, वाडीप्रमुख जयवंत खांबे, मथुकर खांबे, शृंगारतळी शहर अध्यक्ष वेदांत देवळेकर, सल्लागार सुरेश खांबे, मनसे मुंबई गाव अध्यक्ष संतोष खांबे, शाखा अध्यक्ष गंगाराम खांबे, विष्णू खांबे, रुपेश खांबे, अनंत खांबे, सुनील खांबे, संदीप खांबे, विद्या खांबे, मीना खांबे, माधुरी खांबे, विजया खांबे, शिवण्या खांबे, रतन खांबे, सुभाष खांबे यांच्यासह महापुरुष मंडळ आणि सालबाई देवी महिला मंडळ (धाकटा घराणा) पांगारी खांबेवाडी ग्रामस्थ, महिला उपस्थित होते.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.