loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरी वन परिक्षेत्रात बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला मोठे यश

रत्नागिरी : रत्नागिरी वन परिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून बागायतदार आणि शेतकऱ्यांच्या नाकीनऊ आणणाऱ्या माकडांचा बंदोबस्त करण्यात वन विभागाला मोठे यश आले आहे. विशेष म्हणजे, शासनाच्या नवीन निर्णयामुळे माकड पकडण्याच्या दरातही कपात झाल्याने सरकारी तिजोरीवरील भारही हलका झाला आहे. आतापर्यंत ४५० माकडांना सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. मात्र ज्या भागात माकडं पकडण्यात आली. त्या भागात पुन्हा माकडांचा उपद्रव वाढलेला दिसत नाही. त्यामुळे या मोहिमेत भितीने त्या भागात पुन्हा माकड येत नसल्याचा पाहणी अहवाल वन विभागाचा आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

रत्नागिरी वन परिक्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात माकडांचा उपद्रव सुरू आहे. अनेक शेतकरी आणि बागायतदारांनी या उपद्रवामुळे शेती करणे सोडुन दिले. याबाबत मोठ्या प्रमाणात उठाव झाला सुमारे साडे तीन ते चार हजाराच्या वर माकडं असल्याची प्राथमिक माहिती पुढे आली होती. त्यानंतर माकडे पकडण्याची मोहीम वन विभागाने हाती घेतली आहे. या मोहिमेत आतापर्यंत वन विभागाने ४५० माकडांची धरपकड करण्यात यश आले. ​पूर्वी एका माकडाला पकडण्यासाठी ७८० रुपये इतका खर्च वन विभागाला करावा लागत होता. मात्र, राज्य शासनाने संपूर्ण राज्यासाठी आता ४५० रुपये असा एकच दर निश्चित केला आहे. या निर्णयामुळे रत्नागिरी वन विभागाने कमी खर्चात अधिक कार्यक्षमता दाखवली आहे. पकडण्यात आलेल्या ४५० माकडांसाठी सुधारित दराप्रमाणेच खर्च करण्यात आला असून, यामुळे वन विभागाच्या निधीची मोठी बचत झाली आहे.

टाईम्स स्पेशल

वन विभागाने जिल्ह्यातील ​लांजा, ​राजापूर, ​संगमेश्वर, ​रत्नागिरी या चार तालुक्यात ही मोहीम राबवून ही कारवाई करण्यात आली. ​या चारही तालुक्यांत ३ विशेष पिंजऱ्यांच्या मदतीने ही मोहीम राबवण्यात आली. माकडांना पकडताना त्यांची सुरक्षा आणि नियमांचे पालन व्हावे, यासाठी प्रत्येक कारवाईचे व्हिडिओ आणि फोटो काढून त्याचे रेकॉर्डिंग ठेवले जात आहे, जेणेकरून प्रक्रियेत पारदर्शकता राहील, अशी माहिती रत्नागिरी परिक्षेत्र वन अधिकारी प्रकाश सुतार यांनी दिली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg