खेड (दिलीप देवळेकर) : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड–दापोली राज्य मार्गावर खेड शहरानजीक योगिता डेंटल कॉलेज परिसरात महिंद्रा पिकअप आणि वॅगनार कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील चौघेजण जखमी झाले असून सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पुणे येथील एक कुटुंब दापोली तालुक्यातील दाभोळ येथे फिरण्यासाठी वॅगनार कारमधून जात होते. खेड शहराजवळील योगिता डेंटल कॉलेज शेजारी त्यांच्या कारची समोरून येणाऱ्या महिंद्रा पिकअप गाडीशी जोरदार समोरासमोर धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप गाडी रस्त्याच्या कडेला असलेल्या सुमारे २५ ते ३० फूट खोल खड्ड्यात उतरली.
दरम्यान, वॅगनार कार पुलाच्या संरक्षण कठड्याला अडकून राहिल्याने ती पलटी होण्यापासून वाचली. त्यामुळे मोठी जीवितहानी टळली. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले आणि त्यांना उपचारासाठी खेड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. या अपघातात लहान मुलासह एकाच कुटुंबातील चार जण जखमी झाले असून त्यांच्या प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अपघाताचे नेमके कारण काय याचा अधिक तपास सुरू आहे. अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.


































































































































































.jpg)




.jpg)







































































































































































































.jpg)


































































































































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.