loader
Breaking News
Breaking News
Foto

डायव्हर्जनमुळे अपघातांची मालिका; महामार्गावर उपाययोजनांची मागणी

संगमेश्‍वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या कामादरम्यान अनेक ठिकाणी अचानक रस्ता बंद करून पर्यायी मार्ग (डायव्हर्जन) दिले जात आहेत. मात्र त्या ठिकाणी पुरेशी सूचना फलक, प्रकाशयोजना किंवा सुरक्षेची उपाययोजना नसल्यामुळे चालकांना अचानक वळण घ्यावे लागत आहे. त्यामुळे वाहनांचा ताबा सुटून अपघात होण्याचे प्रकार वाढले आहेत. विशेषतः संगमेश्वर परिसरात सर्वाधिक डायव्हर्जन करण्यात आले असून त्यामुळे वारंवार वाहतूक कोंडीही निर्माण होत आहे. मोठ्या वाहनांसह दुचाकी आणि चारचाकी चालकांना अचानक बदललेल्या मार्गामुळे अडचणींचा सामना करावा लागत आहे. स्थानिक नागरिक व वाहनचालकांनी प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी तातडीने लक्ष देऊन योग्य सूचना फलक, प्रकाशयोजना व सुरक्षेची उपाययोजना करूनच चौपदरीकरणाची कामे करावीत, अशी मागणी केली आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg