loader
Breaking News
Breaking News
Foto

रत्नागिरीमधील सुप्रसिद्ध व्यक्तीमत्व श्रीमती केतकी साळवी ह्यांचे दुःखद निधन

रत्नागिरी (वार्ताहर) - रत्नागिरीमधील सुप्रसिद्ध व्यक्तीमत्व श्रीमती केतकी किरण साळवी ह्यांचे दिनांक 13 मार्च 2026 रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. त्या सिविल इंजिनीर होत्या. त्यांनी रत्नागिरी ज़िल्हा परिषदमध्ये सिविल इंजिनीयर म्हणून काम केले होते व उत्कृष्ट अधिकारी म्हणून नाव लौकिक मिळावीला होता. सामाजिक, सार्वजनिक तसेंच संस्कृतीक क्षेत्रातील धडाडीचे कार्यकर्ते स्वर्गीय किरण साळवी ह्यांच्या त्या पत्नी होत. पतीच्या निधनानंतर त्यांनी सामाजिक व सार्वजनिक क्षेत्रामध्ये कार्य सुरु ठेवले होते. अनेकांना त्यांनी उत्कृष्ट सहकार्य व आर्थिक मदतही केली होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मृत्यू समयी त्यांचे वय 65 वर्ष होते. विशेष म्हणजे त्यांचा वाढदिवस ह्याच महिन्यात 22 तारखेला होता. त्यांच्या अंत्यविधी च्या वेळी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी मोठ्या संख्येने उपस्तित होते. श्री देव भैरी देवस्थान चे अध्यक्ष मुन्ना शेट सुर्वे, नु इंडिया कंपनी चे राज्य स्तरीय माजी अधिकारी भाई साहेब सामंत आदी मान्यवर उपस्तित होते. कर्मचारी नेते सुधाकरराव सावंत ह्यांनी त्यांना श्रद्धांजली वाहून त्यांचे कौतुक केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg