loader
Breaking News
Breaking News
Foto

पनवेलमध्ये गॅस दरवाढी विरोधात काँग्रेसने काढला मोर्चा

पनवेल - राज्य शासनाने केलेल्या गॅस दरवाढी विरोधात आज पनवेलमध्ये काँग्रेस पक्षातर्फे पायी मोर्चा काढण्यात आला. यावेळी प्रतीकात्मक सिलेंडरची अंत्ययात्रा काढून केंद्र व राज्य शासनाचा निषेध करण्यात आला. पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज हा मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये पनवेल शहर जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष हेमराज म्हात्रे, महिला आघाडी प्रभारी चंद्रकला नायडू, नगरसेवक हरेश केणी, लतीफ शेख, लीला कातकरी, डॉक्टर अमित दवे, अमित लोखंडे, राकेश जाधव, सुरेश पाटील, सुधीर मोरे यांच्यासह शेकडो त्रस्त ग्राहक सहभागी झाले होते त्यांनी मोदी सरकार विरोधात घोषणा दिल्या. तसेच गॅसची दरवाढ रद्द करा, अशी मागणी केली. सदर मोर्चा हा प्रांत कायार्लयापर्यंत नेण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी निवेदन देताना पनवेल शहर जिल्हा काँग्रेस कमिटी जिल्हा अध्यक्ष सुदाम पाटील यांनी सांगिलते की, शासनाने गॅसची दरवाढ केली आहे. ती सर्वसामान्यांचे कंबरडे मोडणारी आहे. यामुळे गॅस सिलेंडरची कृत्रिम टंचाई दाखवून ३ ते ४ हजाराला सिलेंडर ब्लॅकने विकले जात आहेत. यासाठी शासनाने भरारी पथक नेमून संबधीतांवर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे, तर नगरसेवक हरेश केणी यांनी सुद्धा मोदी सरकारचा निषेध करून गॅस टंचाईमुळे अनेक हॉटेल बंद पडली आहेत. यातून महागाई वाढणार आहे व कित्येकांच्या उद्योग धंद्यांचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालावे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg