loader
Breaking News
Breaking News
Foto

मीठबंदर रोडवरील “खाऊ गल्ली”चे रेडीमेड स्टॉल जीर्ण अवस्थेत, नागरिकांकडून चौकशीची मागणी

ठाणे ( प्रतिनिधी) - ठाणे महापालिका निवडणुका पार पडल्या असल्या तरी ठाणे पूर्वेतील कोपरी प्रभागातील विकासकामांबाबत आता गंभीर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. गेल्या पावणेचार वर्षांत या प्रभागासाठी महापालिकेमार्फत कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याचा दावा केला जातो. मात्र हा निधी नेमका कुठे आणि कसा खर्च झाला, याचा स्पष्ट हिशोब अद्याप नागरिकांसमोर आलेला नसल्याने संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे फेरीवाल्यांच्या पुनर्वसनाच्या नावाखाली आणण्यात आलेले “खाऊ गल्ली”चे रेडीमेड स्टॉल. कोपरीतील मीठबंदर रोडवरील विसर्जन घाटाकडे जाणाऱ्या रस्त्यावर, साधारण दोन ते अडीज वर्षांपूर्वी लाखो रुपयांचा खर्च करून हे हलवता येणारे (रेडीमेड) स्टॉल ठेवण्यात आले होते. परिसरात व्यवस्थित खाद्यपदार्थांची गल्ली तयार करण्याचा महापालिकेचा दावा त्या वेळी करण्यात आला होता.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

मात्र नियोजनाच्या अभावामुळे हा प्रकल्प प्रत्यक्षात कधीच सुरू झाला नाही. परिणामी, जनतेच्या पैशातून आणलेले हे स्टॉल आज जीर्ण अवस्थेत पडून आहेत. अनेक स्टॉलची रचना खराब झाली असून आतील साहित्य मोडकळीस आलेले दिसते. स्वच्छतेचा अभाव आणि देखभालीअभावी काही ठिकाणी स्टॉलमध्ये कचरा जमा झालेला दिसतो. त्यामुळे लाखो रुपयांचा सार्वजनिक निधी अक्षरशः वाया गेल्याची टीका स्थानिक नागरिकांकडून होत आहे. कोपरी प्रभागात विविध नागरी सुविधांवर मोठ्या प्रमाणात निधी खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी प्रत्यक्षात अनेक कामांची अवस्था पाहता नियोजन, अंमलबजावणी आणि पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे या सर्व कामांची सखोल चौकशी करून कोट्यवधी रुपयांच्या निधीचा तपशील जनतेसमोर मांडावा, अशी मागणी आता कोपरीकर नागरिकांकडून जोर धरू लागली आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg