loader
Breaking News
Breaking News
Foto

धामापूर-मालवण नव्या नळपाणी योजनेचे काम बोगस; ठाकरे शिवसेनेच्या नगरसेवकांचा आरोप

मालवण (प्रतिनिधी) - मालवण शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धामापूर-मालवण नव्या नळपाणी योजनेचे पाईपलाईन टाकण्याचे काम सध्या सुरु असून चौके येथे सुरु आलेल्या या नळपाणी योजनेच्या कामाची ठाकरे शिवसेना गटनेते महेंद्र म्हाडगूत, पाणीपुरवठा समिती सदस्य तपस्वी मयेकर यांनी पाहणी करत हे काम बोगस पद्धतीने सुरु असल्याचा आरोप करत या कामावर कोणाचेही नियंत्रण नसल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. ठाकरे शिवसेनेचे नगरसेवक महेंद्र म्हाडगुत व तपस्वी मयेकर यांनी चौके येथे नळपाणी योजनेच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी कामाच्या ठिकाणी एकही इंजिनिअर अथवा कामाच्या नियंत्रणासाठी नियुक्त करण्यात आलेल्या एजन्सीचा प्रतिनिधी नसल्याचे दिसून आल्याने म्हाडगुत व मयेकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत तपस्वी मयेकर म्हणाले, मालवणवासीयांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या नळयोजनेच्या साईटला भेट दिली असता बोगस पद्धतीने काम सुरू असल्याचे निदर्शनास आले. त्याठिकाणी एकही अधिकारी किंवा इंजिनिअर नसताना कामगार स्वतः काम करत आहेत. यात कोणतीही लेव्हल नाही, योग्य खोदाई केली गेलेली नाही. लिकेजची टेस्ट करण्याआधी ही पाईप लाईन टाकत आहेत. आम्ही शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या सर्व नगरसेवकांनी वेळोवेळी प्रशासनाला सूचना देऊनही त्यावर काही उपाययोजना होत नाही, असेही मयेकर म्हणाले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच नळपाणी योजनेचे पाईप हे हैड्रॉलिक प्रेसिंग पद्धतीने जोडायचे असतात, जेणेकरून जॉईंट मधून पाणी गळती होऊ नये. असे असताना या योजनेच्या कामाच्या ठिकाणी पाहणी केली असता गावठी पद्धतीने पाईप जोडत असण्याचे निदर्शनास आले. याबाबत विचारणा केली आसता हीच हैड्रॉलीक प्रेसिंग पद्धत आहे,असे अधिकार्‍यांनी सांगितल्याचे तपस्वी मयेकर म्हणाले. त्याचप्रमाणे नळपाणी योजनेची पाईप लाइन रस्त्याच्या बाजूने टाकणे जरुरीचे असताना ती जंगलमय भागातून आणि लोकांच्या खासगी जागेतून टाकली जात आहे. जर ही पाईपलाइन लीक झाली तर खासगी जागेत दुरुस्तीला विरोध केला तर काय उपयोजना आहे याबाबत आम्ही विचारणा केली तर प्रशासनाकडे याचे उत्तर नाही असेही तपस्वी मयेकर यांनी सांगत भुयारी गटार योजनेप्रमाणेच नळपाणी योजनेची अवस्था होण्याची भीती मयेकर यांनी व्यक्त केली. दरम्यान, मालवणच्या मुख्याधिकारी, नगराध्यक्ष आणि इतर पदाधिकार्‍यांनी नळपाणी योजनेच्या केलेल्या पाहणीची कल्पना पाणीपुरवठा समितीच्या सदस्यांना देण्यात आलेली नसल्याने आम्ही याबाबत जनतेसमोर माहिती देणार आहोत, असेही मयेकर यांनी म्हटले आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg