loader
Breaking News
Breaking News
Foto

पळसंब जि. प. शाळा येथे अत्याधुनिक प्रवेशद्वार लोकार्पण सोहळा संपन्न

मालवण (प्रतिनिधी) - आपण या समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि याच एकमेव उद्देशाने येथील प्रवेशद्वाराच्या निर्मितीसाठी आपण खारीचा वाटा उचलला. पळसंब शाळेचे हे प्रवेशद्वार संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्याचे आज आदर्श असे ठरले असून यासाठी सर्वानीचे प्रयत्न केलेत ते प्रयत्न कौतुकास्पद असून भविष्यातही याप्रशालेसाठी आणि या गावासाठी जेवढे सहकार्य करता येईल तेवढे सहकार्य करण्याचे आश्वासन सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्रसिद्ध उद्योजक देवगडचे माजी सभापती सचिन माणगावकर यांनी पळसंब येथे बोलताना व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लोक सहभागातून उभारण्यात आलेल्या पळसंब शाळा न. १ च्या प्रवेशद्वारचा लोकार्पण सोहळा मोठ्या उत्साहात उद्योजक सचिन मानगावकर यांच्या अध्यक्षतेखाली आणि माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग राजेंद्र पराडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत श्रीफळ वाढवून व फित कापून लोकर्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून बोलताना माजी उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पराडकर यांनी आज या प्रशालेचे हे प्रवेशद्वार म्हणजे खऱ्या अर्थाने या गावाची एकी चे फळ आहे. येथील सर्व ग्रामस्थ, आजी-माजी विद्यार्थी, शिक्षक, मुख्याध्यापक, लोकप्रतिनिधी, शाळा कमिटी सदस्य यांनी तन-मन-धन अर्पण करून काम केल्यामुळेच असे सुंदर प्रवेशद्वार आपल्याला पाहायला मिळाले. पळसंब गावात यापूर्वी अनेक उच्चपदस्थ सर्व क्षेत्रातील अधिकारी, खेळाडू कलाकार निर्माण झाले होते. भविष्यात येथील मुलेही उच्चशिक्षित होऊन या गावाचे नाव निश्चितच रोशन करतील असे सांगितले

टाईम्स स्पेशल

या वेळी पळसंब सरपंच अविराज परब, गटशिक्षणाधिकारी मालवण संजय माने, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सरिता संजय कदम, आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर प्रशिक्षका अर्चना अशोक गोउल्कर, केंद्रप्रमुख देऊ जंगले, सरिता पवार, शाळा समिती अध्यक्ष रविकांत सावंत, प्रशालेचे मुख्याध्यापक विनोद कदम, मालवण पंचायत समितीचे माजी उपसभापती अशोक बागवे, दिगबर साटम, प्रमोद सावंत, पिठ्या सावंत, देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष रमेश परब, माजी सरपंच चंद्रकांत गोलतकर, पुनम गोलतकर, पोलीस पाटील अनुष्का परब, दत्तप्रसाद पेडणेकर, विपूल जुवेकर, सुरेश गावकर, अरुण पुजारे, राजन पुजारे, अनिल पुजारे, दिवाकर पुजारे, विलास सावंत गुरुजी, राजेद्रप्रसाद गाड, अपूर्वा पवार, माजी शिक्षक सोनगट्टे, गवाणकर, मधुकर परब, विजय पुजारे, दशरथ सावंत, सुनिल मुणगेकर, रमेश मुणगेकर, रामकृष्ण पुजारे, अमरेश पुजारे, अमित पुजारे, प्रमोद पुजारे, अरुण पुजारे, पंचक्रोशीतील शिक्षक ग्रामस्थ महिला मुले मोठया संख्येने उपस्थित होती. आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर सरिता संजय कदम आणि आंतरराष्ट्रीय वेटलिफ्टर प्रशिक्षिका अर्चना अशोक गोलतकर यांना त्यांनी आजवर केलेल्या क्रीडा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याचा गौरव म्हणून पळसंब प्रशालेच्या वतीने मानपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ देऊन गौरव करण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg