loader
Breaking News
Breaking News
Foto

राजापूरच्या झर्ये गावातील दिप्ती विश्वासरावचे एमबीबीएसमध्ये यश

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - केवळ स्वत:च्या बुध्दीत्तेच्या जोरावर जिद्द आणि चिकाटीमुळे राजापूर तालुक्यातील झर्ये गावातील दिप्ती विश्वासराव हिने गव्हरमेंट कॉलेज अकोला येथून वैद्यकीय क्षेत्रातील एमबीबीएस ‘ए’ ग्रेड मध्ये यशस्वीरीत्या पुर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पुर्ण केले आहे. आर्थिक परीस्थिती नसतानाही ग्रामीण भागातील या मुलीने मिळविलेले यश सर्वासाठी प्रेरणादायी असुन आदर्शवत आहे. पैशाचे पाठबळ असले की डॉक्टर तर अनेक जण होतात. पण दिप्तीचे वैशिष्ट्‌य वेगळे आहे. त्यामुळे तिचे हे यश आनंद देणारे ठरले आहे. घरातून कोणतेही खंबीर आर्थिक पाठबळ नसताना देखील दीप्तीने केवळ स्वतःच्या बुद्धीमत्तेच्या व अविरत अभ्यास करण्याच्या चिकाटीमुळे आज हे यश संपादन केले असल्याने तिचे सर्वत्र कौतुक होत आहे. सह्याद्रीच्या पायथ्याशी असणार्‍या अतिशय दुर्गम गाव झर्ये येथील दिप्ती दर्शना दशरथ विश्वासराव लहानपणापासूनच अभ्यासाची आवड आणि हुशार होती. दिप्तीची इयत्ता पाचवीमध्ये नवोदय विद्यालय पडवे या ठिकाणी निवड झाली आणि इथूनच पुढे तिच्या विद्यार्थी जीवनातील यशाचा मार्ग सुरू झाला. बारावी पर्यंतचे तिचे शिक्षण याच विद्यालयात झाले. सीबीएसई अभ्यासक्रमात इयत्ता बारावीत ९२ टक्के गुण मिळवून ती उत्तीर्ण झाल्यानंतर पुढे डॉक्टर व्हायची तिची इच्छा होती.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

डॉक्टर व्हायचे तर नीट ही अवघड प्रवेश पात्रता परीक्षा द्यावी लागणार, परंतू.. या परीक्षेचे मार्गदर्शन लांजा किंवा राजापूर तालुक्यांत उपलब्ध नव्हते. त्याचबरोबर इतर शहरांमध्ये जाऊन या मार्गदर्शनाचे वर्गासाठी प्रवेश घेणे, राहण्याची व जेवणाची तसेच इतर खर्चासाठी लाखो रुपये खर्च करून व्यवस्था करणे आर्थिक दृष्ट्‌या तिच्या पालकांना परवडणारे नव्हते, खूपच अवघड होते.परंतु दीप्ती नाराज झाली नाही. आपली बुद्धी हेच आपले भांडवल या एकाच विचाराने तिने नीट च्या परीक्षेची तयारी सुरू केली. केवळ मोबाईलवरती तिने युट्युब चॅनेलच्या माध्यमातून अनेक मार्गदर्शक शिक्षकांच्या पाठांचे अवलोकन केले. त्यावरच आपला अभ्यास सराव सुरू ठेवला. प्रामाणिकपणे आणि चिकाटीने जर अभ्यास केला तर कोणतेही यश दूर नाही हे तिने दाखवून दिले. तिच्या या प्रयत्नांना यश येऊन पहिल्याच प्रयत्नात तिने नीट या अवघड परीक्षेत ६०० गुण प्राप्त करून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे एमबीबीएस या अभ्यासक्रमासाठी प्रवेश मिळविला.

टाइम्स स्पेशल

तिथे गेल्यानंतर भारतरत्न सचिन तेंडुलकर यांच्या ट्रस्टच्या परीक्षेत देखील तिने उत्तुंग यश संपादन केले आणि त्यामुळे तिचा चार वर्षाचा संपूर्ण खर्च सदर ट्रस्ट मार्फत शिष्यवृत्ती देऊन करण्यात आला. तिच्या बुद्धिमत्तेमुळे तसेच अभ्यासातील सातत्य व चिकाटीमुळे अनेक सामाजिक संस्था व समाज बांधव, तिचे मार्गदर्शक शिक्षक, नातेवाईक यांनी देखील आपल्या परीने सहकार्य केले. आर्थिक परिस्थिती नसल्यामुळे काहीजण खचून जातात, दुःखी होतात. परंतु आर्थिक परिस्थितीवर मात करून कठोर मेहनत करण्याची जर तयारी असेल, तसेच मोबाईलसारख्या आधुनिक साधनाचा योग्य वापर केल्यास कोणतेही यश दूर नाही, हे दिप्तीने सिद्ध करून दाखविले आहे. म्हणूनच दिप्तीचा आजच्या विद्यार्थ्यांसाठी एक आदर्श घेण्यासारखा आहे. तिच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg