loader
Breaking News
Breaking News
Foto

ठाण्यात इमारतीच्या टेरेसवरील स्टोअर रुममध्ये आग

ठाणे (प्रतिनिधी) : ठाणे महानगर पालिकेच्या हद्दीत असलेल्या नौपाडा परिसरातील राम मारुती रोडवरील ओम रामेश्वर इमारतीच्या टेरेसवरील स्टोअर रुममध्ये बुधवारी (ता.१५) सायंकाळी आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली नाही. नौपाड्यातील जैन ट्रेडर्सजवळील तळ अधिक ६ मजली इमारतीच्या टेरेसवरील स्टोअर रुममध्ये ही आग लागल्याची माहिती मिळताच महावितरण कर्मचारी, अग्निशमन दलाचे जवान तसेच आपत्ती व्यवस्थापन कक्षाचे कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

अग्निशमन दलाने तत्परतेने प्रयत्न करत सुमारे १८:३५ वाजेपर्यंत त्या आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले. या आगीत स्टोअर रुममधील इलेक्ट्रिक वायरिंग, प्लंबिंग साहित्य तसेच इतर सामान जळून नुकसान झाले आहे. यावेळी १ फायर इंजिन व १ रेस्क्यू वाहन पाचारण करण्यात आले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg