loader
Breaking News
Breaking News
Foto

गाडीची काच फोडुन दागीने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी केले गजाआड 

पनवेल - उभ्या गाडीची काच फोडुन आतील मौल्यवान दागीने व रोख रक्कम चोरणाऱ्या दोघा सराईत गुन्हेगारांना पनवेल तालुका पोलिसांनी गजाआड केले असून त्यांच्याकडून  मौल्यवान दागिन्यासह रोख रक्कम व गुन्ह्यात वापरलेली दुचाकी वाहन हस्तगत केले आहे. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीतील गो ग्रिन हॉटेल, कल्ले गाव या हॉटेलचे पार्कीगमध्ये फिर्यादी यांनी पार्क करुन ठेवलेल्या फॉर्च्यूनर कारचे डाव्या बाजुची पाठीमागील काच फोडुन गाडीतील पर्सची व पर्समधील एकूण ८,४८,५००/- रु. किमतीचे दागीने व रोख रक्कम चोरी केली असून सदर बाबत पनवेल तालुका पोलीस ठाणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. याबाबत पोलीस आयुक्त मिलींद भारंबे, पोलीस सह आयुक्त संजय येनपुरे, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ३, पनवेल प्रशांत मोहिते, सहा. पोलीस आयुक्त, पनवेल विभाग भाऊसाहेब ढोले यांनी अधिक शोध घेण्या संदर्भात वरिष्ठ पोलीस निरीक्षक गजानन घाडगे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) आनंदा कांबळे, गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे सहा. पोलीस निरीक्षक अनुरुध्द गिजे, पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा विजय देवरे, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल, पोहवा शिवाजी बाबर, पोहवा भुषण म्हारसे, पोशि आकाश भगत याना मार्गदर्शन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

त्यानुसार सदर गुन्हयाचा करण्यात आलेला तांत्रीक तपास व गुप्त बातमीदारामार्फत प्राप्त करण्यात आलेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उप निरीक्षक हर्षल राजपुत, पोहवा महेश धुमाळ, पोहवा सुनिल कुदळे, पोहवा सतिष तांडेल व पोहवा शिवाजी बाबर यांचे पथकाने इंडी, जि. विजापूर, कर्नाटक येथे जावून सापळा रचून सदर गुन्हा करणारे आरोपीत शेरा सुरेश चव्हाण, वय ४१ वर्षे, (रा. शिरढोण, म्हाडा, बी-४, रुम क्र. १०३, पहिला माळा, खोणी पलावा, मानपाडा, डोंबिवली. जि. ठाणे), मु. रा. नवपुरा गाव, पो. बोगना, मर्दा थाना, जि. काझीपुर, उत्तरप्रदेश व विनोद उर्फ लंगडा अशोक पवार, वय ४३ वर्षे, (रा. अंबुजवाडी, लक्ष्मी चाळ, मालवणी, मालाड, मुंबई), मुळ रा. आंजुर्गी, ता. जि. विजापूर, राज्य कर्नाटक यांना ताब्यात घेवून अटक करण्यात आली आहे. सदर दोन्ही आरोपीत यांना न्यायालयाने दि. १६/०४/२०२६ रोजीपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली. तपासादरम्यान त्यांचेकडून गुन्हयातील चोरी केलेले सोने व लेडीज पर्स असा एकूण १,८३,५००/- किमतीचा ऐवज व आरोपीतांनी गुन्हयात वापरलेली रु. ७०,०००/- किमतीची यामाहा एफझेड मोटरसायकल जप्त करण्यात आली आहे.

आरोपीतांकडे गुन्हयाचे अनुषंगाने अधिक तपास करण्यात येत आहे. सदर दोन्ही अटक आरोपीत हे सराईत गुन्हेगार असून त्यांचेवर विविध पोलीस ठाण्यात खालील नमुद तक्त्याप्रमाणे गुन्हे नोंद आहेत. त्यामध्ये आरोपी शेरा सुरेश चव्हाण याचेविरुध्द मुरबाड, निगडी, वर्सोवा, कोपरखैरणे, खारघर, नवघर, सीबीडी बेलापुर, पनवेल शहर पोलीस,  रबाळे, एनआरआय सागरी, तळोजा, खांदेश्वर, नेरुळ, मनोर (पालघर), दादर (मुंबई), बोईसर (पालघर) पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत. तर आरोपी विनोद उर्फ लंगडा अशोक पवार याचेविरुध्द निगडी (पिंपरी चिंचवड), गावदेवी, मालवणी, चारकोप, बोरीवली पोलीस ठाणे येथे गुन्हे दाखल आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg