loader
Breaking News
Breaking News
Foto

जायंट्स ग्रुप ऑफ रत्नागिरी तर्फे मोफत चष्मे वाटप शिबिर

रत्नागिरी - रत्नागिरीतील अग्रगण्य नामांकित सामाजिक संस्था जायंट्स ग्रुप रत्नागिरी तर्फे रविवार दिनांक 12 एप्रिल रोजी पिंपळवाडी, बागकर मंडळ, भाटी मिऱ्या रत्नागिरी, येथे नेत्र तपासणी आणि मोफत चष्मे वाटप शिबिर संपन्न झाले. या उपक्रमासाठी जवळपास 150 गरजू रुग्णांनी नाव नोंदणी केली होती. त्यातील शंभरच्या वर गरजूंची नेत्र तपासणी करून त्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. तसेच मोतीबिंदूचे निदान झालेल्या रुग्णांना पुढील मार्गदर्शन करण्यात आले. सदर उपक्रमाला उदंड प्रतिसाद मिळाला, त्यामुळे असे शिबिर पुन्हा घ्यावे अशी इच्छा उपस्थित नागरिकांनी व्यक्त करून सदर कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

सदर कार्यक्रमासाठी नूतन सदस्य आणि पुराणिक ब्रदर्स ऑप्टिशियनचे संजय पुराणिक आणि त्यांचे सहकारी प्रसाद तुपे, सार्थक पुराणिक, संजना वीर यांनी विशेष मेहनत घेऊन शिबिर यशस्वी केले. ग्रुपचे अध्यक्ष महेश दामले तसेच माजी अध्यक्ष लक्ष्मीकांत भुते यांनी आणि बागकर मंडळाने कार्यक्रमाचे उत्तम नियोजन केले होते. जायंट्स फेडरेशनचे स्पेशल कमिटी मेंबर मिलिंद सावंत, संजय पाटणकर तसेच सदस्य सचिन बारटक्के, सुनील सहस्रबुद्धे, विनय जोशी, भरत इदाते, प्रसन्न मुळे इत्यादी सभासदांनी मोलाचे सहकार्य केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg