loader
Breaking News
Breaking News
Foto

गावागावात शासकीय योजनांचा कॅम्प: मनिषा लाखण यांचा अभिनव उपक्रम

केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - शासनाच्या विविध योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवताना गोरगरीब जनतेला शासनदरबारी खूप हेलपाटा माराव्या लागतात, खूप त्रास सहन करावा लागतो. त्यामुळे होणारी गैरसोय लक्षात घेऊन जिल्हापरिषद सदस्या मनिषा गणेश लाखण यांनी सर्व शासकीय योजनांचा कॅम्प गावागावातून लावून त्या माध्यमातून शासकीय योजनांचा लाभ गोरगरीब जनतेला मिळवून देण्याचा एक नवीन उपक्रम हाती घेतला आहे. या सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून घेतलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

लाडकी बहीण योजना, आधार कार्ड, मतदान कार्ड, आभा कार्ड, रेशन कार्ड, कामगार योजना या सारख्या अनेक शासकीय योजना ख-या लाभार्थीपर्यंत पोहचत नाहीत. कारण या योजनांचा लाभ मिळवण्यासाठी कोणती कागदपत्र लागतात? नोंदणी कुठे आणि कशी करावयाची? याची माहिती नसते. शासन दरबारी जाऊनही वेळेत काम होत नाही. वारंवार खेपा माराव्या लागतात. यासाठी आर्थिक भुर्दंड सोसावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन आसगे जिल्हापरिषद गटातील जिल्हापरिषद सदस्य मनिषा लाखण यांनी आपल्या मतदार संघातील विविध गावामध्ये कॅम्प आयोजित करुन योजनांचा लाभ देण्यास सुरूवात केली आहे. या अंतर्गत वेरळ, खेरवसे, बेनी, आडवली, शिपोशी, कुरचुंब आदी गावामध्ये कॅम्प आयोजित करून लोकांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून दिला आहे. विनाशुल्क कॅम्प भरवला जात असून गावामध्ये लोकांना योजनांचा लाभ मिळू लागल्यामुळे मतदार संघातील जनतेतून समाधान व्यक्त केले जात आहे. गोरगरीब जनतेपर्यंत शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी जिल्हापरिषद सदस्य म्हणून आम्ही कटिबद्ध असून आमदार किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली काम करीत असल्याचे सांगण्यात आले.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg