देवळे (प्रकाश चाळके) - वाडापेठ कुंभारवाडी येथे शिवसेना पक्षात भव्य प्रवेश सोहळा संपन्न झाला असून, स्थानिक पातळीवर या कार्यक्रमाला मोठा प्रतिसाद मिळाला. कुंभारवाडी अध्यक्ष सुधाकर माटल तसेच ज्येष्ठ शिवसैनिक व माजी उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र कुंभार यांनी आमदार किरण सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेना पक्षात अधिकृत प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यावेळी परिसरातील अनेक कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना आमदार किरण सामंत यांनी नव्याने प्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांचे स्वागत करताना सांगितले की, “शिवसेना हा सर्वसामान्यांचा पक्ष असून विकासाच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत. आपल्या भागातील विकासकामांना गती देण्यासाठी अशा अनुभवी कार्यकर्त्यांचा पक्षात समावेश होणे अत्यंत महत्त्वाचे आहे.”
यावेळी सुधाकर माटल आणि हरिश्चंद्र कुंभार यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “आमदार किरण सामंत यांच्या नेतृत्वाखाली मतदारसंघात मोठ्या प्रमाणावर विकासकामे होत आहेत. त्यांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून आम्ही शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असून, पुढील काळात पक्ष बळकट करण्यासाठी पूर्ण ताकदीने काम करू.” कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनीही आपल्या भाषणातून या प्रवेशाचे स्वागत करत पक्ष संघटना अधिक मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला. कुंभारवाडी परिसरात या प्रवेशामुळे शिवसेना पक्षाला अधिक बळ मिळणार असल्याची भावना व्यक्त होत आहे.
या भव्य प्रवेश सोहळ्यामुळे वाडापेठ कुंभारवाडी परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, आगामी काळात स्थानिक राजकारणात या घडामोडींचा प्रभाव दिसून येणार आहे. यावेळी कुंभारवाडी अध्यक्ष सुधाकर माटल ज्येष्ठ शिवसैनिक माजी उपविभाग प्रमुख हरिश्चंद्र कुंभार, वाडापेठ शाखाप्रमुख सुरेंद्र कारेकर, वाडापेठ उपसरपंच सुनील रूमडे, माजी महिला विभाग प्रमुख स्नेहल रुमडे यांनीही शिवसेना पक्षाचा भगवा हाती घेतला आहे.. यावेळी तालुका प्रमुख दीपक नागले, पंचायत समिती सभापती नंदनी कदम उपस्थित होते.
















































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)
























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.