loader
Breaking News
Breaking News
Foto

श्री समर्थ कृपा विद्यालयात डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी

खेड - श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मिडियम स्कूल व ज्युनिअर कॉलेज (सी .बी .एस .ई) वेरळ मध्ये मंगळवार दि. १४ एप्रिल २०२६ रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती साजरी करण्यात आली. यावेळी प्रशालेचे प्राचार्य डॉ. एस. एस. अली यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण केला. याचे औचित्य साधून घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेमध्ये आराध्या दळवी, ओमर जसनाईक, पूर्वा भोसले, इसा मुकादम, नारायणी गित्ते, सफा जसनाईक, ओम कदम, श्लोक पाटील, सार्थक डोईफोडे या विद्यार्थ्यांनी अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच प्रशालेच्या प्राचार्यांनी विद्यार्थ्यांना भारतीय संविधानाचे शिल्पकार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती दिली. याप्रसंगी संस्था अध्यक्ष सुयश पाष्टे, संस्थेचे चेअरमन उदय शेटवे, प्राचार्य डॉ. एस. एस. अली, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सहर कौचाली यांनी केले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg