loader
Breaking News
Breaking News
Foto

खेडमध्ये तालुक्याध्यक्षांच्या नेतृत्वाने प्रभावित होवून कार्यकर्त्यांचा राष्ट्रीय काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश

खेड (प्रतिनिधी)- दि. १३ रोजी खेड काँग्रेस कार्यालयात अजीमभाई सुर्वे, तालुकाध्यक्ष यांच्या अध्यक्षतेखाली तातडीची मिटींग घेण्यात आली. या सभेमध्ये अजीमभाई यांनी गेली दीड ते दोन वर्षे अतिशय चांगल्यारितीने काम करून राष्ट्रीय काँग्रेसपक्षामध्ये नवचैतन्य निर्माण करुन तसेच आपल्या प्रभावशाली नेतृत्वाने सर्व काँग्रेस सदस्यांनी पुढील काही वर्ष अझीमभाई यांनी कार्यभार संभाळावा असे सांगून सर्वानुमते ठरावही केला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

तसेच त्यांचे प्रभावी नेतृत्त्व बघून सिमा नितीन जाधव (शिंदे) व कौसर बशिर मुजावर यांनी पक्ष प्रवेश केला. यावेळी मंगेश भैरवकर, खेड शहर अध्यक्ष, फैसल देसाई, कार्याध्यक्ष, तौफीक पोत्रिक, उपाध्यक्ष मुराद लाडघरकर, इब्राहीम परकार, मुबारक घारे, महमंद काझी, नाझिमा तांबे असे बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी प्रफुल्ल शेवरकर जनरल सेक्रेटरी यांनी सर्वांचे आभार मानले.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg