loader
Breaking News
Breaking News
Foto

सावंतवाडी समाज मंदिर येथे डॉ आंबेडकर जयंती विविध कार्यक्रमाने साजरी

सावंतवाडी (प्रतिनिधी) - सावंतवाडी नगरपरिषद व बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज प्रबोधन समन्वय समिती सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाज मंदिर परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती विविध कार्यक्रमाने साजरी करण्यात आली. प्रारंभी भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने त्रिशरण व पंचशील ग्रहण करण्यात आली तर समता सैनिक दलाबर्फत मान वंदना देण्यात आली. यावेळी आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत पंचायत समितीच्या सभापती सुस्मिता जाधव, नगराध्यक्षा श्रध्दा सावंत भोसले, उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर, जि. प. सदस्य मायकल डिसोझा, राष्ट्रीय किसान मोर्चा प्रभारी चंद्रकांत नागावकर, माजी नगराध्यक्ष संजू परब, संविधानिक हितकारणीचे जिल्हाध्यक्ष महेश परूळेकर, सावली फाउंडेशन च्या संस्थापक सावली पाटकर, टिळाजी जाधव, संतोष जाधव इत्यादी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण हे होते.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

प्रारंभी समन्वय समितीचे सचिव सगुण जाधव यांनी प्रास्ताविक करून समन्वय समितीच्या विविध उपक्रमांचा आढावा घेतला. तर स्वागताध्यक्ष सद्गुरु जाधव यांनी सर्वांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी सभापती सुष्मिता जाधव, नगराध्यक्षा भोसले, उपनगराध्यक्ष निरवडेकर इत्यादींचा शाल सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी नगराध्यक्ष भोसले यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तृत्वाचा आढावा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सावंतवाडीतील १९३२ च्या भेटीला उजाळा दिला व बाबासाहेबांचे कर्तुत्व डोळ्यासमोर ठेवूनच आपली सामाजिक वाटचाल सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. सभापती सुस्मिता जाधव यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या कर्तुत्वाची उंची हिमालयापेक्षाही उंच असल्याचे सांगून बाबासाहेबांच्या मुळेच आज आम्ही या प्रगतीपथावर असल्याचे स्पष्ट केले व समाजाची बांधिलकी कायम ठेवणार असल्याचे स्पष्ट केले. उपनगराध्यक्ष अँड निरवडेकर यांनी डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानामुळेच मला हे पद मिळाल्याची भावना व्यक्त करून डॉक्टर बाबासाहेबांचे शासनकर्ती जमात का व्हावी हे स्वप्न होते हे स्पष्ट सांगून आपल्या दोन महिन्याच्या कारकीर्दीत विकासाचा कशी संधी साधून काम केले हे त्यांनी स्पष्ट केले. तर प्रमुख अतिथी म्हणून मार्गदर्शन करताना चंद्रकांत नागावकर यांनी बाबासाहेबांचे अपूर्ण राहिलेले स्वप्न साकारण्यासाठी बाबासाहेबांच्या अनुयायानी जीवाची बाजी लावून काम करावे असे आवाहन करून तरुणांनी चळवळीत सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन केले. तर शेवटी अध्यक्षपदावरून बोलताना जगदीश चव्हाण यांनी संविधान आमचा सर्वोच्च ग्रंथ असल्याचे सांगून संविधान जपणे हे आम्हा सर्वांचं काम आहे हे स्पष्ट केले.

टाईम्स स्पेशल

यावेळी मायकल डिसोजा, महेश परुळेकर इत्यादींनी मार्गदर्शन केले शेवटी शांताराम असंनकर यांनी आभार मानले. यावेळी समाजातील विविध क्षेत्रात नावलौक मिळवणाऱ्यांचा सत्कार आहे. आमदारांच्या हस्ते करण्यात आल्याशिवाय रक्तदान केलेल्या रक्तदान रक्तदात्यांचा सन्मान तसेच तसेच नुकत्याच पार पडलेल्या भीमगीत गायन स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरणही करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सगुण जाधव व चिन्मय असंनकर यांनी केले. दरम्यानच्या काळात तांबोळी येथील तरुण गायक अमित तांबोळकर प्रस्तुत स्वरधारा संगीत मैफिल निर्मित बुद्ध शिव फुले शाहू आंबेडकर यांच्यावर आधारित भीम गीतांचा बहारदार भिवांजली हा भव्य सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आला. दरम्यान सायंकाळी भव्य मिरवणूक काढून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. दरम्यान जि. प. चे अध्यक्ष प्रमोद कामत, युवा नेते विशाल परब यांच्यासह अनेक जिल्ह्यातील मान्यवरांनी बाबासाहेबांच्या अर्ध्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg