loader
Breaking News
Breaking News
Foto

खाजगी सावकारांना आता राज्य शासनाचे कठोर नियम

रत्नागिरी : खाजगी सावकारांकडून कर्जदार शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांची होणारी पिळवणूक थांबवण्यासाठी राज्य शासनाने आता कंबर कसली आहे. महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ अंतर्गत सावकारांना आता त्यांच्या व्यवसायाच्या ठिकाणी शासनाने निश्चित केलेल्या व्याजदराचा फलक लावणे अनिवार्य करण्यात आले आहे. सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था यांनी यासंदर्भात कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. १५ जून २०२५ पर्यंत या आदेशाची अंमलबजावणी करण्याचे आदेश दिले असून नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करू, असा इशारा जिल्हा उपनिबंधक सोपान शिंदे यांनी सांगितले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी शासनाने २०१४ पासून राज्यात कठोर सावकारी कायदा लागू केला आहे. मात्र, अनेक ठिकाणी अद्यापही छुपे अवाजवी व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. यावर प्रतिबंध लावण्यासाठी आता सावकारांना आपला परवाना आणि अधिकृत व्याजदराचा फलक ग्राहकांना स्पष्ट दिसेल अशा दर्शनी भागात लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. यामध्ये सावकाराने व्यवसायाच्या ठिकाणी २ बाय २ फूट आकाराचा, काळ्या पार्श्वभूमीवर पांढऱ्या अक्षरात स्पष्ट दिसेल असा फलक लावावा, या फलकासोबतच अधिकृत सावकारी परवान्याची प्रत लावणे आवश्यक आहे, अनुसूचित क्षेत्रामध्ये व्याजाचा दर हा ग्रामसभेमार्फत निश्चित केला जाईल, याची नोंदही फलकावर असणे गरजेचे आहे, ही संपूर्ण प्रक्रिया १५ जून २०२५ पर्यंत पूर्ण करण्याचे आदेश सर्व क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आले आहेत.

टाइम्स स्पेशल

शासनाने दिलेले अधिकृत व्याजदर ही निश्चित केले आहेत. कर्जाचा प्रकार तारण कर्ज (प्रतिवर्ष) विनातारण कर्ज (प्रतिवर्ष) शेतकऱ्यांसाठी कर्ज ९ टक्के, १२ टक्के, इतर व्यक्तींसाठी कर्ज १५ टक्के १८ टक्के असे निश्चित केले आहे. याचे उल्लंघन केल्यास कायदेशीर कारवाई केली जाईल, असे सहकार आयुक्तांनी स्पष्ट केले आहे. सर्व सावकारांनी या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. ज्या सावकारांच्या व्यवसायाच्या ठिकाणी असे फलक आढळणार नाहीत किंवा जे विहित दरापेक्षा जास्त व्याज आकारतील, त्यांच्यावर महाराष्ट्र सावकारी (नियमन) अधिनियम २०१४ मधील तरतुदींनुसार फौजदारी व कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg