दापोली (प्रतिनिधी) - दापोली शहरात विद्युत पोलवरून लोंबकळणार्या धोकादायक तारांमुळे शॉर्ट सर्किट, आगीच्या घटना आणि जीवितहानीचा धोका वाढला असला तरी मात्र महावितरणचे अशा महत्त्वाच्या समस्यांचे निराकरण करण्यास पुर्णपणे दुर्लक्ष झाल्याचे दिसत आहे. दापोली शहरातील लोकमान्य टिळक चौक, नटराज नाका येथे यशवंत स्टोअर्स जवळ आणि रिक्षा स्टँड ठिकाणी असलेल्या एका विदयुत पोलवर तारांचे जंजाळ वाढले आहे. या वाढलेल्या विदयुत तारांच्या जंजाळामुळे शॉर्ट सर्किटच्या घटना घडणारच नाहीत हे अजिबातच नाकारता येत नाहीत. असे असताना आणि नुकतेच शहरात शॉर्ट सर्किटच्या घटनेने अग्नीचे तांडव पसरुन त्यात तीन दुकाने पूर्णपणे जळून खाक झाल्याची घटना घडल्याचे उदाहरण ताजे असतानाही महावितरण जागे होत नाही. आणखीन किती आगीच्या घटना वा दुर्घटना घडल्यानंतर महावितरणला जाग येणार आहे, असे जनतेतून विचारण्यात येत आहे.
अशा या प्रकाराने रहिवाशांना मोठया भयाची चिंता सतावत आहे. दापोली शहरात ठिकठिकाणी असलेल्या विदयुत पोलच्या एकाच खांबावरून अनेक ग्राहकांना विदयुत पुरवठा केला जात असल्याने या वाहिन्या एकमेकांना चिकटल्याने अनेक वेळा आग लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. शहरातील अनेक भागात विद्युत तारा लोंबकळल्याने त्या घराच्या छताजवळ आल्या आहेत. काही तारा तर चक्क छताला चिटकल्या आहेत. यामुळे अनुचित प्रकार घडण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त होत आहे. शहरात विद्युत व्यवस्थेसाठी विद्युत खांब बसविण्यात आले आहेत. यातून विद्युत ग्राहकांना विद्युत जोडणी दिलेली आहे. असे असले तरी अनेक ठिकाणी विद्युत तारा लोंबकळल्या आहेत. काही ठिकाणी तर तारा छताच्या अगदीच जवळ आल्या आहेत.
अनेक नागरिकांचे दोन ते तीन मजली घर आहे. अशा घराजवळून विद्युत तारा अगदीच चिकटून गेल्याने या तारा घराच्या गॅलरीमधून हाताचा स्पर्श होईल, अशा अंतरावर आहेत. यामुळे लहान मुलांचा खेळताना विद्युत तारांना स्पर्श होईल, याची भितीही नागरिकांमध्ये असते. अनेकदा महिलांना छतावर धुणे किंवा इतर वस्तू वाळविण्यासाठी ठेवाव्या लागतात. अशावेळी महिलांचा तारांना स्पर्श होऊ शकतो, याचा धोकाही आहे. तसेच काही नागरिकांच्या छतावरून तारा आडव्या गेल्या आहेत. यामुळे नागरिकांना दुसरा मजला बांधण्यासही अडचणी येत आहेत.















































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.