loader
Breaking News
Breaking News
Foto

मतदार यादीतील फेरफार आणि बोगस मतदारांविरोधात भाजपचा एल्गार; रत्नागिरीत 'मिशन शुद्धीकरण'चा श्रीगणेशा

भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र प्रदेशाच्या वतीने संपूर्ण राज्यात राबविल्या जाणाऱ्या 'एसआयआर' (मतदार यादी शुद्धीकरण) प्रक्रियेचा शुभारंभ रत्नागिरीत मोठ्या उत्साहात पार पडला. शहरातील हॉटेल विवेक येथे आयोजित करण्यात आलेल्या या महत्त्वपूर्ण कार्यशाळेत माजी खासदार आणि भाजपचे प्रदेश संयोजक किरीट सोमया यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर 'मिशन शुद्धीकरण'ची घोषणा केली. यावेळी त्यांनी घुसखोर आणि बोगस मतदारांना मतदार यादीतून हद्दपार करण्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव उपस्थित होते. ​या कार्यशाळेला संबोधित करताना किरीट सोमया यांनी मागील अनुभवांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, यापूर्वी मतदार याद्या तयार करताना विविध एजन्सींनी केलेल्या निष्काळजीपणामुळे आणि चुकांमुळे लोकशाहीचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक पात्र मतदारांची नावे गहाळ झाली होती, तर मोठ्या प्रमाणावर बोगस नावांचा समावेश झाला होता. याचा थेट फटका मतदानाच्या टक्केवारीवर आणि निकालांवर बसला आहे. मात्र, आता भाजपने हे आव्हान स्वीकारले असून, शुद्ध मतदार यादी हाच लोकशाहीचा खरा पाया असल्याचे त्यांनी नमूद केले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या मोहिमेअंतर्गत रत्नागिरीतील भाजप कार्यकर्ते पुढील १० दिवस घरोघरी जाऊन प्रत्यक्ष सर्वेक्षण करणार आहेत. या विशेष अभियानात कुटुंबातील पात्र सदस्यांची नोंदणी करणे, मयत किंवा स्थलांतरित व्यक्तींची नावे वगळणे आणि प्रामुख्याने संशयास्पद किंवा बोगस मतदारांची ओळख पटवून ती यादीतून काढणे यावर भर दिला जाणार आहे. सोमया यांनी स्पष्ट केले की, २००४ च्या मतदार यादीतील त्रुटी सुधारून २०२४ ची सुधारित आणि अचूक यादी तयार करणे हे या मोहिमेचे मुख्य उद्दिष्ट आहे. ​या मोहिमेमुळे खऱ्या आणि प्रामाणिक मतदारांना न्याय मिळेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. कार्यकर्त्यांनी 'डोअर-टू-डोअर' मॅपिंग करून प्रत्येक मतदाराला मदत करावी, जेणेकरून एकही पात्र मतदार मतदानापासून वंचित राहणार नाही. या कार्यक्रमाला रत्नागिरी जिल्ह्यातील भाजपचे वरिष्ठ नेते, पदाधिकारी आणि शेकडो उत्साही कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनीही दुबार आणि 'घोस्ट' (बोगस) मतदारांची नावे शोधून काढण्यासाठी कंबर कसण्याचे आवाहन केले. आगामी काळात ही मोहीम जिल्हाभर तीव्र करण्यात येणार असून, पारदर्शक मतदानासाठी भाजप सज्ज झाली आहे.

टाइम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg