loader
Breaking News
Breaking News
Foto

​सावंतवाडीत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी; संजू परब, अनिल निरवडेकर यांनी केले अभिवादन

सावंतवाडी (प्रतिनिधी) - ​सावंतवाडी समाजमंदिर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समन्वय समिती सावंतवाडी आणि तमाम तालुकावासियांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती अत्यंत उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख सच्चिदानंद (संजू) परब, उपनगराध्यक्ष अँड अनिल निरवडेकर, सभापती सुष्मिता जाधव यांनी उपस्थित राहून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. ​कार्यक्रमाच्या सुरुवातीला समन्वय समितीच्या वतीने प्रमुख पाहुण्यांचे विचारमंचावर स्वागत करण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

यावेळी उपस्थित समाजबांधवांना मार्गदर्शन करताना संजू परब यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या थोर कार्याला उजाळा दिला. त्यांनी आपल्या मनोगतातून बाबासाहेबांच्या विचारांवर चालण्याचे आवाहन करत उपस्थितांना जयंतीच्या शुभेच्छा दिल्या. तसेच, "समाजकार्यासाठी आणि समाजबांधवांच्या अडीअडचणीच्या वेळी माझे सहकार्य सदैव तत्पर असेल," अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. ​या कार्यक्रमास उपनगराध्यक्ष अँड. अनिल निरवडेकर, सभापती सुश्मिता जाधव, जिल्हा बँक संचालक विद्याधर परब, समन्वय समितीचे अध्यक्ष जगदीश चव्हाण, क्लेटस फर्नाडिस, गुंडू जाधव यांच्यासह मोठ्या संख्येने समाजबांधव उपस्थित होते.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg