loader
Breaking News
Breaking News
Foto

आंबयेच्या सुपुत्राचा सन्मान; अनंत धोत्रे यांना राष्ट्रपती पुरस्कार

खेड (प्रतिनिधी) - खेड तालुक्यातील आंबये गावचा सुपुत्र अनंत भिवाजी धोत्रे यांना त्यांच्या कर्तृत्वाचा मानाचा मुजरा मिळाला आहे. मुंबई येथील अग्निशमन दलात सब ऑफिसर या पदावर कार्यरत असताना उत्कृष्ट सेवेसाठी त्यांना केंद्र सरकारकडून राष्ट्रपती पुरस्काराने गौरविण्यात आले.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

धोत्रे यांनी आपल्या सेवाकाळात अनेक धाडसी मोहिमा यशस्वीपणे पार पाडत नागरिकांचे प्राण वाचविण्यात मोलाची भूमिका बजावली आहे. आपत्कालीन परिस्थितीत जीवाची पर्वा न करता केलेल्या कार्याची दखल घेत त्यांना हा प्रतिष्ठेचा सन्मान प्रदान करण्यात आला.

टाईम्स स्पेशल

या यशामुळे आंबये गावासह खेड तालुक्याचा मान उंचावला असून सर्वत्र त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. ग्रामीण भागातून पुढे येत राष्ट्रीय पातळीवर मिळवलेले हे यश तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg