loader
Breaking News
Breaking News
Foto

साईकृपा एकता फाउंडेशन खेड, तिसेचा स्तुत्य उपक्रम; दादरमध्ये रक्तदान शिबिराला प्रतिसाद

खेड - साईकृपा एकता सोशल वेल्फेअर फाउंडेशन, खेड - कोकण (तिसे, शिंदे सकपाळवाडी) यांच्या वतीने रविवार, १२ एप्रिल २०२६ रोजी दादर रेल्वे स्थानक येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. केईएम हॉस्पिटलच्या सहकार्याने पार पडलेल्या या शिबिरात सुमारे १०० रक्तदात्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. रक्तदान शिबिराला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याने हा उपक्रम यशस्वी ठरला. संकलित रक्तामुळे अनेक गरजू रुग्णांना जीवनदान मिळणार असून, या उपक्रमातून समाजकार्याचा संदेश देण्यात आला.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

या सामाजिक उपक्रमामुळे खेड तालुक्यातील तिसे, शिंदे-सकपाळवाडी येथील फाउंडेशनच्या कार्याचा गौरव होत आहे. समाजसेवेची भावना जपत राबविण्यात आलेल्या या शिबिराचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. केईएम हॉस्पिटलच्या टीमनेही फाऊंडेशनच्या कार्याचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. या उपक्रमासाठी फाउंडेशनचे पदाधिकारी, सदस्य, स्वयंसेवक तसेच केईएम हॉस्पिटलच्या रक्तपेढी टीमने मोलाचे सहकार्य केले. सर्व सहकार्यकर्त्यांचे मनःपूर्वक आभार मानत फाउंडेशनने भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे. “समाजासाठी एकत्र येऊ, समाजहितासाठी कार्य करू” हा संदेश देत साईकृपाएकता सोशल वेल्फेअर फाउंडेशन, खेड-कोकण (तिसे, शिंदे सकपाळवाडी) समाजसेवेच्या वाटचालीत पुढे सरसावत आहे.

टाईम्स स्पेशल

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg