केळंबे-लांजा (सिराज नेवरेकर) - लांजा शहरातून गेलेल्या उड्डाण पुलाला लांजा तहसिलदार कार्यालयासमोर अंडरपास (भुयारी)मार्ग न ठेवल्यामुळे जनतेतून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. गेली दहा वर्ष मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरणाचे काम सुरू असताना.आणि अंडरपास ची मागणी असताना देखील गेली दहा वर्षात अंडरपास ब्रीज चे काम पुर्ण होऊ शकले नाही, हे लांजातील जनतेचे दुर्दैव्य असल्याचे बोलले जात असुन यापुढे तरी भुयारी मार्गाचे काम पुर्ण होईल का? असा संतप्त सवाल जनतेतून केला जात आहे. दरम्यान जनतेच्या लढ्यात महाविकास आघाडीने उडी घेतल्याने अंडरपास चा विषय संध्या चांगलाच तापू लागला आहे. मुबई-गोवा महामार्गाचे काम सुरू होऊन दहा वर्ष होत आली तरी काम अद्याप पुर्ण होताना दिसून येत नाही. दस्तुरखुद्द केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या कामामुळे मला खुप त्रास झाला आहे. मे महीना अखेरपर्यंत काम पूर्ण होईल, असे सांगितले आहे.
त्यामुळे मुंबई गोवा महामार्गाचे बरीच वर्ष रखडलेले काम आता जलदगतीने पुर्ण होऊन जनतेला होणारा त्रास आता दुर होणार आहे. त्यामुळे आता लांजा उड्डाण पुलाला अंडरपास (भुयारी) मार्गाचे काम होणार नाही हे स्पष्ट झाले असुन पुढील नवीन आराखड्यात काम गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. महामार्गाचे काम सुरू असताना सदर अंडरपास चे काम करणे सोईस्कर होते. आता झाले नाही तर.. यापुढे महामार्ग बंद ठेवून काम करणे शक्य आहे का? अशीही चर्चा जनतेतून केली जात आहे. तत्कालीन माजी खासदार, माजी आमदार याच्या काळात अंडरपास ब्रीज ची मागणी करण्यात आली होती. अधिकारी वर्गापर्यंत सदर विषय गेला होता. मात्र पुढे कोणतीही कार्यवाही झालेली नाही हे स्पष्ट दिसुन येत आहे. जनतेच्या हितावह असणारे प्रश्न लोकप्रतिनिधींकडून सुटत नसतील तर याला जबाबदार कोण? असा सवाल देखील जनतेतून उपस्थित केला जात आहे. लांजा शहरातून गेलेल्या उड्डाणपुलाखालून लांजा साटवली फाटा आणि कोर्ले फाटा या दोन ठीकाणी अंडरपास ब्रीज वगळता अन्यत्र अंडरपास ब्रीज कोठेही ठेवण्यात आला नाही. लांजा हायस्कूल किंवा तहसिलदार कार्यालयासमोर अंडरपास ब्रीजची मागणी करूनही संबधित प्रशासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले असल्याने जनतेतून प्रचंड नाराजी व्यक्त होत आहे.
लांजा शहरातील उड्डाण पुलाचे काम जोरदार सुरू आहे. पुलाला जोडण्यात येणा-या रस्तावर भिंत घालण्याचे कामाला जोरदार सुरुवात झाली आहे त्यामुळे लांजा हायस्कूल, जि.प.शाळा नं.५, पोलीस स्थानक, पंचायत समिती कार्यालयासमोर महामार्गाच्या रस्त्याच्या मधोमध भिंत उभी रहाणार असल्यामुळे कर्मचारी, नागरिकांसह विद्यार्थी सह सर्वानाच इकडून तिकडे ये-जा करण्यासाठी मोठी गैरसोय निर्माण होणार असल्पाचे बोलले जात आहे. दरम्यान याबाबत उपअभियंता कुलकर्णी यांनी माहिती देताना सांगितले की, अद्याप अंडरपास ब्रीजच्या मागणीला मंजुरी मिळालेली नाही. दोन ठीकाणी ये जा चे मार्ग असल्याचे सांगितले. अंडरपास ब्रीज नसल्यामुळे रस्ता ओलांडून जाताना मोठा वळसा घेऊन जाणे भाग पडणार आहे. लांजा शहरातील पुलाची लांबी मोठी असल्यामुळे पुलाच्या खालून अंडरपास ब्रीज लांजा हायस्कूल कींवा तहसिल कार्यालयासमोर ठेवणे आवश्यक होते. संबधित यंत्रणेकडून डोळेझाक करून जनतेच्या ज्वलंत मागणीकडे दुर्लक्ष केल्यामुळे भुयारी मार्गाच्या लढाईत महाविकास आघाडीने उडी घेतली असून जनतेच्या हितासाठी आंदोलन छेडण्याचा ईशारा दिला आहे. त्यामुळे अंडरपास ब्रीजचा विषय चांगलाच ऐरणीवर आला आहे.















































































































































1.jpg)





































.jpg)











































































































































































































































































































































1.jpg)













.jpg)




























































.jpeg)





































































































































































































































































.jpg)



























































3 Comments
Denise Barrett
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.
Jesse Cole
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incidid magna aliqu enimad min incididunt labore dolore sed.
Timothy Tyler
Lorem ipsum dolor amet consectetur adipisic elit eiusmod tempor incididunt labore dolore magna aliqu enimad min incididunt ut labore et dolore sed.