loader
Breaking News
Breaking News
Foto

कोकणात बुडणार्‍या पर्यटकांना आता रोबो वाचवणार

अलिबाग (वार्ताहर) - कोकणातील समुद्र किनार्‍यांवर येणार्‍या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी रोबोटीक वॉटर क्राफ्ट तैनात केल्या जाणार आहेत. आपत्कालीन काळात बुडणार्‍या पर्यटकांना वाचविण्यासाठी जीवरक्षक प्रणाली म्हणून या रोबोटीक वॉटरक्राफ्टचा वापर केला जाणार आहे. निळाशार समुद्र आणि रुपेरी वाळू , नारळ पोफळीच्या बागा यांचे अप्रुप राज्यातील विविध भागातील पर्यटकांना असते, त्यामुळे दरवर्षी लाखो पर्यंटक कोकणातील विवीध समुद्र किनार्‍यांवर दाखल होत असतात. मात्र पाण्याचा अंदाज अनेकदा पर्यटक बुडण्याच्या घटना घडतात. ग्रामिण भागात जिवरक्षक तैनात नसतात. त्यामुळे पर्यटकांचे जीव धोक्यात येतात. रायगड जिल्ह्यात गेल्या काही वर्षात काशिद, दिवेआगर, हरिहरेश्वर, मुरुड, अलिबाग समुद्र किनार्‍यांवर पर्यटक बुडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky22.jpg

ग्रामिण भागातील समुद्र किनार्‍यांवर जीव रक्षक तैनात करण्याचा खर्च स्थानिक ग्रांमपंचायतींना परवडत नाही. हीबाब लक्षात घेऊन आता कोकणच्या समुद्र किनार्‍यांवर रोबिटीक वॉटर क्राफ्ट तैनात केल्या जाणार आहेत. सध्या रायगड जिल्ह्यातील तीन समुद्र किनार्‍यांवर हे रोबोटीक लाईफ सेव्हींग वॉटर क्राफ्ट तैनात केले जाणार आहेत. यात अलिबाग तालुक्यातील नागाव, मुरुड तालुक्यातील काशिद तर श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर येथील समुद्र किनार्‍यांचा समावेश असणार आहे. तर येत्या काळात आणखिन १५ रोबोटीक लाईफ सेव्हींग वॉटर क्राफ्ट उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. त्यामुळे रायगडचे किनारे पर्यटकांसाठी अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहेत. या यंत्रणेला राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल तसेच नेव्हीच्या नौदलाच्या मानकांनुसार मान्यता मिळाली आहे. त्यासाठी आवश्यक चाचण्याही पूर्ण झाल्या असल्याचे सांगितले जात आहे.

टाईम्स स्पेशल

जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून रायगड जिल्ह्यातील प्रमुख समुद्र किनार्‍यांसाठी उपलब्ध करून ली जाणार आहे. समुद्रकिनार्‍यावर भरती ओहोटी दरम्यान उद्भवणार्‍या आपत्कालीन परिस्थितीमध्ये तात्काळ मदत पोहोचवण्यासाठी पूर्णतः स्वयंचलित रोबोटिक वॉटर क्राफ्ट अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. या शिवाय रिमोट कंट्रोलच्या साहाय्याने सहजपणे चालवता येणार आहे. हे यंत्र पाण्यात अडकलेल्या व्यक्तींपर्यंत वेगाने पोहोचून त्यांना सुरक्षित किनार्‍यावर आणण्यास सक्षम आहे. एका वेळी २०० किलो ग्रॅम वजन ओढून आणण्याची क्षमता या यंत्रात आहे. त्यामुळे एकाच वेळी दोन व्यक्तींना वाचवणे शक्य होणार आहे.

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky23.jpg
foto
Author: रत्नागिरी टाइम्स

3 Comments

leave a reply

Recent Posts

latest # news

https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky24.jpg
रत्नागिरी टाइम्स
https://ratnagiritimes.in//assets/images/2020/add/2020/sky21.jpg